शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नवरगावच्या सरपंच व सचिवाचे ग्रामसभेतून पलायन

By admin | Updated: January 27, 2015 23:31 IST

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ जानेवारीला आयोजित ग्रामसभा गोंधळातच पार पडली. अखेर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभेतून पलायन करावे लागले.

नवरगाव: सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ जानेवारीला आयोजित ग्रामसभा गोंधळातच पार पडली. अखेर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभेतून पलायन करावे लागले. २६ जानेवारीला सर्वत्र विशेष ग्रामसभा आयोजित केल्या होत्या. त्याचप्रमाणे नवरगाव ग्रामपंचायतीमध्येसुद्धा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला गावातील १३४ नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्रामसभा आयोजित करण्याच्या स्थळावरुनच वाद सुरू झाला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रजासत्ताक दिनी बसस्थानकावर ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली. मात्र आतापर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर ग्रामसभा न घेतल्याने नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत सभागृहातच ग्रामसभा घेण्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठरविले. याच मुद्यावरून वादाला तोंड फुटले. शेवटी संपूर्ण ग्रामसभा गोंधळात पार पडली. मागील सभेचे इत्तीवृत्त वाचून दाखवावे, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. परंतु ही विशेष ग्रामसभा असल्याने व ते विषयपत्रिकेवर नसल्याने इतिवृत्त वाचून दाखविता येणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे वाद वाढतच गेला. शेवटी आभार मानून ग्रामसभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर सरपंच व ग्रामविकास अधिकारी सभागृहातून बाहेर पडले. गोंधळ सुरुच असताना ही बाब संपूर्ण गावभर पसरली. सरपंच व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामसभेतून पलायन केल्याची वार्ता गावभर पसरली. याबाबत ग्रामविकास अधिकारी बी.सी. शंभरकर यांना विचारणा केली असता, चौकात ग्रामसभा घेणे त्रासदायक ठरते. मागील सभेचा वृत्तांत ही विशेष ग्रामसभा असल्याने पुढील ग्रामसभेत वाचून दाखविला जाईल. सभेतून कुणीही पलायन केले नाही गोंधळ सुरू झाल्याने कार्यालयात येऊन बसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)