शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने केले ५०९ नागरिकांना स्वगावी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. अनेक कामगार हे आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले असता सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत असल्याने त्यांना शासन निर्देशानुसार स्थानबद्ध करण्यात आले होते.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून १७ निवारा केंद्रात केली व्यवस्था । अखेर मजुरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या काळात चंद्रपूर शहरात अडकलेल्या एकूण ५०९ परराज्यातील कामगारांची आतापर्यंत त्यांच्या राज्यात पाठवणी केली असून शनिवारी छत्तीसगड राज्यातील ३८ व मध्य प्रदेशातील ३७ असे एकूण ७५ नागरिक मनपाच्या विशेष वाहनाने त्यांच्या गावी रवाना झाले आहेत. मनपातर्फे सर्वांची खाण्याची व वैद्यकीय तपासणीची सोय करुन सर्वांना खासगी बस व इतर गाडयांमधून त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावी रवाना केले आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. अनेक कामगार हे आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले असता सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत असल्याने त्यांना शासन निर्देशानुसार स्थानबद्ध करण्यात आले होते. तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ अशा विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, अकोला, लातूर, वर्धा, नांदेड, भंडारा, यवतमाळ या विविध शहरातील मजूर, कामगार, विद्यार्थी चंद्रपूर शहरात अडकले होते. मे महिन्यापासून मनपाच्या निवारा केंद्रांमध्ये थांबलेल्या या नागरिकांची निवास, भोजन व आरोग्य व्यवस्था मनपा प्रशासनद्वारे करण्यात येत होती. गेल्या दीड महिन्यात लॉकडाऊनमुळे कामधंदा नाही. कुटुंब गावी या द्विधा मनस्थितीत नागरिक आणि मजूर अडकलेले होते. मात्र महानगरपालिका प्रशासनाने अखेर सर्व प्रक्रिया करून या मजूर, नागरिकांना त्यांच्या गावी वाहनांनी पाठवण्याचा निर्णय घेतला. ७५ प्रवाशी शनिवारी रवाना करण्यात आले. महानगरपालिकेच्या माध्यमातून या कामगारांसाठी गावी जाताना भाजी-पोळी, पिण्याचे पाणी इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती. मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती राजूरवार यांच्या नेतृत्वात विशेष आरोग्य पथकांनी त्यांची आरोग्य तपासणी केली.गडचांदूरातून ४८ परप्रांतीय रवानागडचांदूर : येथील ३५ व कोरपना तालुक्यातील १३ असे एकूण ४८ जण नागरिकांना शनिवारी पालिका प्रशासनाने माणिकगढ सिमेंट कंपनीच्या बसने लखनऊ येथे रवाना केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका