शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २५ दिवसानंतर झाली आई-मुलाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST

बोरचांदली येथील चौथीत शिकणाऱ्या संकेत रामटेके या बालकाच्या वडिलाचे १ एप्रिल रोजी निधन झाले. मात्र तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेली संकेतची आई लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी घरी येऊ शकली नाही. अखेर आईच्या अनुपस्थितीत संकेतने वडिलाच्या चितेला भडाग्नी दिली. समाजमन हादरून सोडणाºया रामटेके कुटुंबाची माहिती पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांना मिळाली.

ठळक मुद्देसावली तालुक्यातील खेडी येथील घटना, पतीचे घेता आले नाही अंत्यदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेलेली आई लॉकडाऊनमुळे अडकली होती. दरम्यान पतीचे अचानक निधन झाले. मात्र पत्नीला अखेरचे दर्शनही घेता आले नाही. मुलाची काळजी आणि पती गेल्याच्या दु:खाने अस्वस्थ झालेल्या आईची तब्बल २५ दिवसानंतर मुलाशी भेट झाली, वेदनादायी असलेल्या सावली तालुक्यातील खेडी येथील या घटनेचा शेवट भेटीने झाल्याने वातावरण भावूक झाले होते.बोरचांदली येथील चौथीत शिकणाऱ्या संकेत रामटेके या बालकाच्या वडिलाचे १ एप्रिल रोजी निधन झाले. मात्र तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेली संकेतची आई लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी घरी येऊ शकली नाही. अखेर आईच्या अनुपस्थितीत संकेतने वडिलाच्या चितेला भडाग्नी दिली. समाजमन हादरून सोडणाऱ्या रामटेके कुटुंबाची माहिती पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांना मिळाली. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांना लगेच सूचना देऊन संकेतची आई कविता रामटेके यांना तेलंगणातून बोरचांदली येथे आणण्याचे कळविले. दरम्यान, राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांनीही प्रयत्न सुरू केले. पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातून सर्व कायदेशीर प्रक्रिया करून घेतल्या. त्यामुळे आई व मुलाची भेट होऊ शकली.गोंडपिपरी पोलिसांकडून माणुसकीचे दर्शनअखेर तेलंगणात अडकलेल्या कविताला आणण्यासाठी २३ एप्रिल रोजी परवानगी मिळाली. बोरचांदली येथून ६०० किलोमीटर दूर असलेल्या कविता रामटेके यांना आणण्यासाठी २४ एप्रिल रोजी तेलंगणात एक वाहन रवाना करण्यात आले. २४ तासांच्या प्रवासानंतर ती सावली तालुक्यातील खेडी येथे पोलिसांसह माहेरी पोहोचली. वडिलाचे निधन झाल्याने मुलगा संकेत हा खेडी येथे आजी आणि मामाकडे राहत होता. वडिलाची सावली हरवलेल्या संकेतला आई आल्याचे समजताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकल्याने अनेक कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आई व मुलगा एकत्र आणण्याकरिता आयुक्त कार्यालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला. पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य होऊ शकले.- संदीप धोबे, ठाणेदार, गोंडपिपरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या