शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात स्वच्छतेवर अधिक जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला. बल्लारपूर शहरात उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण बरेच होते. त्यामुळे रस्त्यालगत घाण दिसत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर: कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता दक्षता घेण्यात स्वच्छतेला सर्वात अधिक महत्त्व आहे. या संदर्भात महत्वाची बाब अशी, स्वच्छ भारत अभियान देशभरात जोरात चालले. गाव हागणदारी मुक्त करण्यावर भर देण्यात आला. स्वच्छता अभियान ज्या ज्या गाव-शहरांनी चांगल्या प्रकारे आपल्या क्षेत्रात राबविले. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला.बल्लारपूर शहरात उघड्यावर शौचाला बसण्याचे प्रमाण बरेच होते. त्यामुळे रस्त्यालगत घाण दिसत होती. पावसाळ्यात तर अशा रस्त्याने जाणे कठीण झाले होते. स्वच्छता अभियान सुरू झाले, नगर पालिकेने त्याकडे विशेष लक्ष दिले. घर तेथे शौचालय असायालाच हवे, हा नियम केला. नागरिकांना त्याकरिता प्रेरित केले. वार्डामध्ये पुरेशा संख्येने सार्वजनिक शौचालय बांधले आणि उघड्यावर बसणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. याकरिता नगरपालिका प्रशासनाला कडक व्हावे लागले. त्याचा चांगला परिणाम झाला. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागली. लहान मुलही कुठे उघड्यावर बसल्याचे येथे आज दिसून येत नाही. यासोबतच, घर-परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष केंद्रित केले. घरचा कचरा संकलित करण्याकरिता सर्व घरी कचराकुंडी दिल्या. या उपक्रमामुळे शहर स्वच्छ व सुंदर झाले. स्वच्छतेचे मोल नागरिकांच्या लक्षात आले. यामुळेच, कोरोना प्रसंगी नागरिकांना स्वच्छतेवर भर द्या,असे जबरीने सांगण्याची वेळ आली नाही. नागरिक सॅनिटायझरचा वापर स्वयंस्फूर्तीने करू लागले आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा शहरात फायदा झाला आहे.पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता सुरूपावसात अस्वच्छतेमुळे ताप, मलेरिया पोटांचे विकार विविध रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे, पावसाचे दिवसात स्वच्छतेकडे लक्ष देणे, गाव स्वच्छ ठेवणे आवश्यक झाले आहे. बल्लारपूर नगर पालिकेने त्याची तयारी सुरू केली असून मोठया नाल्या व शहराअंतर्गत लहान लहान नाल्यांच्या सफाईचे काम सुरु केले आहे. तद्वतच, कोरोनामुळे शहरात निजंर्तुकरणावरही भर देण्यात येत असल्याचे बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुगधा यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या