शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लांबल्याने पावसाळी साहित्याची विक्री ठप्प

By admin | Updated: July 5, 2014 23:31 IST

लांबलेला मान्सून शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आणणारा ठरला असतानाच छत्र्या व अन्य पावसाळी साहित्याची विक्री ठप्प पडल्याने लाखो रुपयाच्या बाजारपेठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चंद्रपूर : लांबलेला मान्सून शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आणणारा ठरला असतानाच छत्र्या व अन्य पावसाळी साहित्याची विक्री ठप्प पडल्याने लाखो रुपयाच्या बाजारपेठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात गजबजावणारी पावसाळी साहित्याची दुकाने ओस पडल्याचे चित्र आहे. छत्र्या, मेनकापड, ताडपत्री, रेनकोट, टोप्या अशा वस्तू ठिकठिकाणी धुळखात पडल्या आहेत. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या साहित्याच्या विक्रीला पावसासारखेच उधाण येते. जून अखेरीस शाळा सुरू झाल्यानंतर बच्चे कंपनीच्या रेनकोटवर उड्या पडू लागतात. पावसाळी साहित्याची प्रामुख्याने मुंबई व कोलकात्याहून ठोक भावाने खरेदी होते.व्यापाऱ्याच्या मते छत्री व रेनकोट उत्पादनाची ही देशातील दोन प्रमुख केंद्र आहेत. याच ठिकाणी नामांकित तसेच स्थानिक व विदेशी वस्तूंची उलाढाल होते. यावेळी चीनचा माल ही बाजारपेठेत आहेतच मात्र गतवर्षीपेक्षा तुलनेने तो कमी आहे. या पावसाळी साहित्यात छत्र्यांची मोठी उलाढाल होते. फोल्डिंगच्या चौकोनी, गोल कॅपशेप, डायमंड, कार्टुन छत्री अडीशने रुपयापासून तर बहुरंगी छत्री शंभर रुपयापासून उपलब्ध आहेत. पॉलिस्टर व नायलॉन कापडाच्या या छत्र्यांपैकी भारतीय बनावटीच्या छत्र्या या चिनी छत्र्यापेक्षा अधिक टिकावू असल्याचे एका दुकानदाराने स्पष्ट केले.रेनकोटचा प्रकार महागडा असला तरी यावेळी त्यातही माफक किमतीचे रेनकोट उपलब्ध झाले आहेत. लॅपटॉप तसेच स्कूल बॅग सामावून घेणारे रेनकोट विद्यार्थ्यांमध्ये तसेच वनपीस रेनकोट महिलांमध्ये प्रिय आहेत. या वस्तुंच किंमतीत यावर्षी १० ते १५ टक्क्याने वाढ झाली आहे. चौकात छत्रीखाली दुकान थाटून जुन्या छत्र्या दुरूस्त करणारे थोडे व्यस्त आहेत. रेनकोट शिवले जात आहेत. मात्र नवी खरेदी ठप्प आहे.(शहर प्रतिनिधी)