शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

रास्त भाव दुकानांच्या वेळेत बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

दुकानदार दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने नाराजी उमटत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली. काही राशन दुकानात केवळ दुपारनंतर धान्याचे वाटप होत असल्याने लाभार्थ्यांची गर्दी उसळत असल्याचा आरोपही होत आहे.

ठळक मुद्देधान्यासाठी लाभार्थ्यांची रांग : सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दुकानदार व रास्तभाव दुकानातून धान्य घेतेवेळी ग्राहकांमध्ये एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले. परंतू रास्त धान्य दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. काही दुकानदार दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने नाराजी उमटत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली. काही राशन दुकानात केवळ दुपारनंतर धान्याचे वाटप होत असल्याने लाभार्थ्यांची गर्दी उसळत असल्याचा आरोपही होत आहे.कोरोना संकटामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दोन व्यक्तींमध्ये एक मिटरचे अंतर ठेवावे, दुकानदारांनी सोशल डिस्टन्ससाठी चौकोन आखावे आणि दुकानासमोर गर्दी होऊ देऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परंतू शहरातील सपना टाकीज मागील परिसरातील दुकानात नियमांचे उल्लंघन झाले. लाकडाऊनमुळे रेशनदुकानातील धान्य वाटप करावे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब रेशन धारकांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धान्य देताना गर्दी होऊ नये, यासाठी दुकानात आवश्यक खबरदारी पाळल्या जात नाही. अपवाद वगळता जिल्ह्यातील अनेक रास्त धान्य दुकानांमध्ये सोशल डिस्टंस्टिंगचे उल्लंघन होत आहे. शहरातील रेल्वेस्टेशन मार्गावरील रास्त धान्य दुकानदार केवळ सायंकाळी ४ ते ६ असे दोन तासच सुरू ठेवत असल्याची ओरड आहे. या वार्डातील यापूर्वीच्या दुकानदाराचा परवाना रद्द झाल्याने तेथील ग्राहकही या दुकानाला जोडण्यात आले. त्यामुळे नागरिकांना धान्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. सध्या नागरिकांच्या हाताला काम नसल्याने खाण्यापिण्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. अशा वेळी रास्त दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्य वाटपासाठी सकाळपासून दुकान सुरू ठेवल्यास होणारी गर्दी टाळता येणे शक्य आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या