शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवरून होतेय बँक ग्राहकांची फसगत

By admin | Updated: January 25, 2015 23:12 IST

‘मी बँकेतून बोलत आहे. तुमचा एटीएम बंद होणार असून दुसरा नंबर मिळणार आहे. त्यासाठी तुमच्या एटीएमवरील १६ अंकी नंबर व पिनकोड नंबर द्या. २४ तासांत दुसरा नंबर मिळेल’, असे मोबाईलवर सांगून

चंद्रपूर : ‘मी बँकेतून बोलत आहे. तुमचा एटीएम बंद होणार असून दुसरा नंबर मिळणार आहे. त्यासाठी तुमच्या एटीएमवरील १६ अंकी नंबर व पिनकोड नंबर द्या. २४ तासांत दुसरा नंबर मिळेल’, असे मोबाईलवर सांगून फसवणूक करणाऱ्या अज्ञात मोबाईलधारकांकडून यापुढे सावध असा. कारण तुम्ही त्याला प्रतिसाद दिला तर तुमचे आर्थिक फसगत होऊ शकते. गेल्या काही महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात अनेकांना असे दूरध्वनी आले आहेत. त्यातील काहींची फसगत झाली आहे. टेलिमार्केटिंगचा गैरवापर करून ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडत आहेत. यासोबतच मोबाईलवर असे अनेक प्रकारचे मॅसेज आणि कॉल येत आहेत. ईश्वर आणि धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन विविध यंत्र विकण्याचा सपाटा सुरू आहे. एवढेच नाही तर दूरचित्रवाहिन्यांवरूनसुद्धा ग्राहकांना भुरळ घातली जात आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या वलयाचा फायदा घेत त्यांना फायदा झाला तुम्हालाही फायदा होईल, असे म्हणत, भाग्योदय यंत्र ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे. याला अनेक नागरिक बळीही पडत आहेत. यासोबतच लॉटरी लागल्याचे मेसेज किवा दूरध्वनीदेखील येत आहेत. त्याद्वारे तुमच्या अकांऊटची माहिती घेतली जाते. त्यातून ठगबाजी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. अशा आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.(प्रतिनिधी)