शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपाययोजनांबाबत आमदारांची उद्योग समूहाशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST

राजुरा : आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात राजुरा विधानसभा क्षेत्रातील उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक ...

राजुरा : आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात राजुरा विधानसभा क्षेत्रातील उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी सर्व कंपन्यांच्या माध्यमातून कोविडच्या काळात ग्रामीण भागातील जनतेकरिता सीएसआर फंडातून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना आ. धोटे यांनी दिल्या.

सर्व कंपन्यांनी मिळून क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयासाठी एनआयव्ही व्हेन्टेलेशन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, जम्बो सिलिंडर, ऑक्सिजन फ्लोमीटर, पल्स ऑक्सिमीटर, मल्टिपॅरा माॅनिटर आणि मेडिसीन्स इत्यादी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच वेकोलि, अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड आणि दालमिया या बड्या उद्योग समूहांना प्रत्येकी ५० बेडचे कोरोना केअर सेंटर आणि २० ऑक्सिजन बेडची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रत्येक उद्योग समूहाने कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचीदेखील सूचना केली आहे.

आमदार सुभाष धोटे यांच्या आवाहनाला क्षेत्रातील सर्व स्थानिक उद्योग समूहांनी सकारात्मक प्रतिसाद देत आमदारांच्या सूचनेनुसार स्थानिक परिसरात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी विशाखा शेरकी, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विनोद डोणगावकर, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, वेकोलिचे सी. पी. सिंग, समीर भरले, डॉ. ओवेश अली, अल्ट्राटेकचे सचिन गोवारदिपे, डॉ. पाल, माणिकगड सिमेंटचे राजेश झाडे, अंबुजा सिमेंटचे श्रीकांत कुंभारे, दालमियाचे उमेश कोल्हटकर उपस्थित होते.