शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर आजारांपासून मुक्ती देणार ‘मिशन इंद्रधनुष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत येत्या 2 डिसेंबर रोजी शहादा तालुक्यातील प्रत्येक ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत येत्या 2 डिसेंबर रोजी शहादा तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शहादा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर  यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ही मोहीम दर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू राहणार आहे.बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पटेल, सर्व तालुका आरोग्य सहायक व तालुका पर्यवेक्षक तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. इंद्रधनुष्य-2 मोहिमेसाठी राज्यातील 25 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात नंदुरबार जिल्हाचीही निवड करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने राष्टीय स्तरावरून मोहीम राबविली होती. या मोहिमेनंतर केलेल्या सर्वेक्षणात शहरी भागातील पूर्ण लसीकरणाचे काम ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी आढळल्याने दिसून आले. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोहीम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. आरोग्य विभागातर्फे या मोहिमेबाबत कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी लसीकरण सनियंत्रण दिलीप पावरा, आरोग्य विस्तार अधिकारी संजय चौधरी, आरोग्य सेवक गणेश लोहारे, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व पर्यवेक्षक, परिचारिका उपस्थित होते. जनजागृतीसाठी आशा कार्यकर्ती, आरोग्य परिचारिका व वैद्यकीय अधिका:यांमार्फत बाह्य लसीकरण सत्रसंस्थास्तरीय लसीकरण सत्र, ओपीडी, नियमित गृहभेटी आदींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती केली जाईल, अशी माहिती डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी दिली. नियोजन  38 तर एकूण मोबाईल सत्र 64 अशा एकूण 102 सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पात्र लाभार्थीची एकूण संख्या गरोदर माता 138 तर 0 ते 2 वयोगटातील एक हजार 68 लाभार्थीचा सर्वे करण्यात आला आहे.मोहिमेचे उद्दिष्टनियमित लसीकरणपासून वंचित राहिलेले बालक व गर्भवती महिलांना 10 गंभीर आजारापासून वाचविण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दोन वर्षाखालील मुलांचा व गरोदर मातांचा तसेच विविध रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे हा मोहिमेचा मुख्य हेतू आहे. लसीकरण केल्यास क्षयरोग, कावीळ, गोवर रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, देवी, हिमोफेलिया व इन्फ्लुएझा आदी आजारांपासून मुक्ती मिळते.उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासन सज्जकेंद्र शासनातर्फे मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे ठरविण्यात आलेले उद्दिष्ट व लसीकरण 100 टक्के करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत शहादा तालुक्यातील संपूर्ण भागातील नियमित लसीकरणाबरोबरच वंचित लाभार्थीचा शोध, स्थलांतरित झोपडपट्टय़ा, बांधकामाच्या   ठिकाणी, भटक्या जमाती, खेडोपाडी माहिती देण्यासाठी प्रशासकीय   यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार  आहे.