बेपत्ता तरुणी अजिंठ्यात आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST2021-02-10T04:28:56+5:302021-02-10T04:28:56+5:30

२४ डिसेंबरपासून केसरी नंदननगरात राहणारी एक तरुणी बेपत्ता होती. याबाबत त्या कुटुंबीयांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार नोंदविली. ती कुठे गेली ...

The missing girl was found in Ajanta | बेपत्ता तरुणी अजिंठ्यात आढळली

बेपत्ता तरुणी अजिंठ्यात आढळली

२४ डिसेंबरपासून केसरी नंदननगरात राहणारी एक तरुणी बेपत्ता होती. याबाबत त्या कुटुंबीयांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार नोंदविली. ती कुठे गेली याबाबत कसलाच सुगावा नव्हता. तात्काळ पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूरचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी विशेष पथक तयार केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, पोलीस हवालदार सुनील गौरकार, अशोक मंजूळकर, उमेश वाघमारे, पोलीस शिपाई मनोहर जाधव, संतोष आडे, सूरज लाटकर होते. पथकाने सर्वत्र शोध मोहीम राबवून अखेर त्या मुलीचे लोकेशन गाठले. ती औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी अजिंठा गाठून तरुणीला ताब्यात घेत कुटुंबीयांच्या सुपूर्द केले.

Web Title: The missing girl was found in Ajanta