कुणबी समाजाचा परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST2020-12-04T04:55:22+5:302020-12-04T04:55:22+5:30

दरवर्षी कुणबी समाज मंडळातर्फे वधू-वर परिचयम मेळावा आयोजित केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंडळाने ऑनलाईन मेळावा घेण्यात येणार ...

Meet the Kunbi community | कुणबी समाजाचा परिचय मेळावा

कुणबी समाजाचा परिचय मेळावा

दरवर्षी कुणबी समाज मंडळातर्फे वधू-वर परिचयम मेळावा आयोजित केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंडळाने ऑनलाईन मेळावा घेण्यात येणार आहे. सर्व समाजबांधवांनी वर-वधुंची ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरून १० डिसेंबरपर्यंत नोंदणी करायची आहे. ऑफलाईन अर्ज तालुकास्तरावरील समाज मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या परिचय मेळाव्याला केवळ उपवर-उपवधू आणि त्यांच्यासोबत पालक प्रतिनिधीनांच उपस्थित राहता येणार आहे. हा कार्यक्रम कुणबी समाज चंद्रपूर या यु ट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे. सहभागी सदस्यांना कोरोनामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून मास्कचा वापर करावा लागणार आहे. मेळाव्याचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुणबी समाज मंडळाच्या वतीने केले आहे.

Web Title: Meet the Kunbi community