शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

मथरा पाणी पुरवठा योजना ११ वर्षांपासून तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी, नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटला तरीही ही योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. मध्यंतरी पाणीपुरवठा नळ योजनेच्या टाकीचे स्वीचरूम विषयी गावकऱ्यांत चांगलाच वाद चिघडला होता.

ठळक मुद्देनागरिकांची पाण्यासाठी भटकंती : पाण्याच्या टाकीचे बांधकाम रखडले

नितीन मुसळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : माथरा येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असल्याने गेल्या ११ वर्षांपासून ग्रामस्थांना नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे नागरिकांना आतापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचा बांधकाम पूर्ण करून योजना सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी, नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटला तरीही ही योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. मध्यंतरी पाणीपुरवठा नळ योजनेच्या टाकीचे स्वीचरूम विषयी गावकऱ्यांत चांगलाच वाद चिघडला होता. मात्र मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. नागरिकांना नळ योजनेचे पाणी मिळावे, यासाठी गावामध्ये नळ योजनेची भूमिगत पाईप लाईन टाकण्यात आली. आता आपल्या घरापर्यंत पाणी पोहचेल म्हणून गावकºयांच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र या पाणी पुरवठा नळ योजनेला ग्रहण लागले आणि अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे ही योजना आजही पूर्ण होऊ शकली नाही. आजघडीला मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या या टाकीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. ग्रापंचायत व पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा नळ योजनेचे काम सुरू होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेचे हे काम राजुरा येथील पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित केले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने किमान आता तरी ही योजना पूर्णत्वास न्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टाकीचे अपूर्ण अवस्थेत असलेले बांधकाम पूर्ण करून तहान भागवावी, अशी मागणी केली जात आहे.माथरा येथे ११ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले.मात्र अल्पावधीतच या पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले. ग्रामपंचायतीने सबंधित विभागाकडे टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला.मात्र अजूनही टाकीचे बांधकाम अपूर्ण असून तातडीने टाकीचे बांधकाम पूर्ण करावे.-लहुजी चहारेसरपंच, माथरामाथरा पाणीपुरवठा नळ योजनेच्या अपूर्ण असलेल्या टाकीचे बांधकामाची चौकशी करून लवकरात लवकर टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल.-ए.के. कोटणाकेअभियंता,पाणीपुरवठा विभाग,राजुरा

टॅग्स :Waterपाणी