मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 03:16 PM2022-03-31T15:16:30+5:302022-03-31T15:27:33+5:30

सायबर सेलच्या लोकेशननुसार आरोपीला अटक करण्यासाठी चंद्रपूरच्या पोलीस पथकाने झारखंडमधील जोरासिमर येथील आरोपीच्या घरी धाड टाकली.

man fooled of 5 lakh in the name of mobile recharge, chandrapur police nabbed accused from jharkhand | मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये

मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये

Next
ठळक मुद्देऑनलाइन गंडा घालणाऱ्यास ठोकल्या बेड्या

चंद्रपूर : मोबाईल रिचार्ज करताना बीएसएनएल कस्टमर केअर सेंटरचालकाने बँकेचा गुप्त कोड मागून चंद्रपुरातील एका ग्राहकाच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ५९ हजारांनी गंडा घातला होता. तक्रार प्राप्त होताच रामनगर पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करून झारखंड राज्यातून आरोपीला बेड्या ठोकल्या. विकास बासुदेव मंडल (वय २५, रा. जोरासिमर, पो. गांडे जि. गिरीडोह) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

चंद्रपुरातील एका व्यक्तीने बीएसएनएल मोबाईल रिचार्ज केला होता. मात्र, रिचार्ज न झाल्याने त्यांनी बीएसएनएल कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक शोधून त्यावर विचार केली. तेव्हा कस्टमर केअर सेंटरचालकाने एसएमएस टू फोन, रिचार्ज क्युब आणि क्लिक सपोर्ट हे तीन ॲप डाऊनलोड केले तर रिचार्ज होते, अशी माहिती दिली. संबंधित व्यक्तीने हे तीनही ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर सूचनेनुसार पुन्हा नेट बँकिंगचा वापर करून १० रुपयांचा रिचार्ज मारण्यास सांगितले आणि वारंवार सूचना करून कस्टमर केअरचालक काहीतरी प्रोसेस करून घेत होता. वारंवार ऑनलाइन प्रोसेस करूनही रिचार्ज न झाल्याने कंटाळून चंद्रपुरातील त्या व्यक्तीने कस्टमर केअरचा फोन बंद केला आणि घरी निघून गेला.

दरम्यान, रात्री मोबाईल बघितला असता बँक खात्यातून ५ लाख ५९ हजार ५४१ रुपये ऑनलाइन विड्राल झाल्याचा मेसेज दिसला. या प्रकरणाने हादरलेल्या चंद्रपुरातील त्या व्यक्तीने १४ सप्टेंबर २०२१ रोजी रामनगर पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, एसडीपीओ सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे ठाणेदार राजेश मुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, हर्षल ऐकरे, सायबर सेलचे संदीप एकाडे, पेतरस सिडाम, राहुल पोंदे, मुजवर अली, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, पांडुरंग वाघमोडे, लालू यादव, विकास जुमनाके यांचे पथक झारखंडला रवाना झाले.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

सायबर सेलच्या लोकेशननुसार आरोपीला अटक करण्यासाठी चंद्रपूरच्या पोलीस पथकाने झारखंडमधील जोरासिमर येथील आरोपीच्या घरी धाड टाकली. मात्र, गावकऱ्यांनी चंद्रपूर पोलिसांना विरोध केला. दरम्यान, झारखंड पोलिसांनी सहकार्य केल्याने आरोपीला बेड्या ठोकून चंद्रपुरात आणले. त्याच्याविरुद्ध रामनगर ठाण्यात भादंवि ६६ सी आयटी कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केलेे. त्याने कबुली दिली आहे.

Web Title: man fooled of 5 lakh in the name of mobile recharge, chandrapur police nabbed accused from jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.