शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासासाठी मेक इन चंद्रपूर

By admin | Updated: January 27, 2015 23:30 IST

मेक इन इंडियाच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेक इन चंद्रपूरची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रजासत्ताक दिनी केली.

चंद्रपूर : मेक इन इंडियाच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेक इन चंद्रपूरची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रजासत्ताक दिनी केली. पोलीस मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होेते. यावेळी महापौर राखी कंचर्र्लावार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना श्यामकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, ताडोबा क्षेत्र संचालन पी.जी. गरड, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे उपस्थित होते.निरोगी व सुदृढ समाजासोबतच व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी राज्यमंत्री मंडळाने चंद्रपूर जिल्हा दारुबंदी घोषित केल्याचे सांगून व्यसनमुक्तीच्या प्रचार प्रसिद्धसाठी ४ कोटी रुपयाची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त समाजासाठी जिल्हावासीयांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सर्वसामान्याच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जाणार असून राज्यात पुढील वर्षात ५ गावांचा दुष्काळ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. आगामी पाच वर्षात २ लाख ५० हजार शेततळी व ५० हजार सिमेंट नाला बांध बांधून सिंचन क्षमता वाढविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. अपुऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील १३५१ गावामधील ३ लाख ५ हजार ४०९ शेतकऱ्यांना २०४ कोटीची मदत सरकारने जाहीर केल्याचे सांगून ८५ कोटीची मदत प्राप्त झाली आहे.वनप्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून वनअकादमी निर्माण करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात जाहीर केला. वनअकादमीसाठी १०० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (नगर प्रतिनिधी)