शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; विजय वडेट्टीवारांच्या रॅलीची ब्रह्मपुरी क्षेत्रात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर करणार याकडे जनतेचे लक्ष लागले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीत नागरिकांनी हजारोच्या संख्येने स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार हे येथून दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेली लक्षवेधक मिरवणूक विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय ठरली आहे. गावागावांतील हजारो नागरिक व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. आपल्यावरील प्रेमामुळेच कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने मिरवणुकीत सहभागी झाल्याचे मत काँग्रेसचे ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर करणार याकडे जनतेचे लक्ष लागले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीत नागरिकांनी हजारोच्या संख्येने स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. मिरवणुकीत विधानसभा क्षेत्रातील सावली, सिंदेवाहीपासून ब्रह्मपुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी सकाळपासून गर्दी करायला सुरूवात केली होती.३ ऑक्टोबर हा दिवस ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रचार सभांच्या इतिहासातील अभूतपूर्व गर्दीचा दिवस ठरला. मिरवणुकीत युवक, युवती, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले. विजय वडेट्टीवार यांचा शहरी तसेच ग्रामीण भागात दांडगा संपर्क आहे. प्रत्येक गावात त्यांचा चाहता वर्ग असल्यामुळेच त्यांच्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे मत ब्रह्मपुरीतील नागरिकांनी व्यक्त केले. सावली तालुक्यातील सावली, व्याहाड, चकपिरंजी, हंरबा, बोथली, व्याहाड खुर्द, व्याहाड बु., उपरी, सामदा, निमगाव, निफंद्रा, गेवरा या गावांसह सिंदेवाही तालुक्यातील राजोली, पळसगाव जाट, रत्नापूर, नवरगाव आदी तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडीसह कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते, पदाधिकारी या मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले.

टॅग्स :bramhapuri-acब्रम्हापुरीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार