शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; लोकहित जोपासणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिशी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

सुधीर मुनगंटीवार यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाजाची सेवा करण्याचा संकल्प आमच्या सरकारने सतत जोपासला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसेवेचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.

ठळक मुद्देमहादेव जानकर : मूल येथे मेंढपाळ परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी विविध कल्याणकारी योजना लागू करण्याच्या दृष्टीने एक हजार कोटी रूपयांची तरतूद जाहीर केली. नेहमीच धनगर समाजाच्या हिताची भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. सदैव लोकहित जोपासणारा हा नेता पुन्हा विधानसभेत बहुमतासह निवडून पाठवावा, असे आवाहन राज्याचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. येथील कर्मवीर मा. सां. कन्नमवार सभागृहात मंगळवारी मेंढपाळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेव जानकर, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, डॉ. विकास महात्मे, डॉ. कन्नमवार, संजय कन्नावार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला धनगर समाज बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती. जानकर यांनी शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी दिली.धनगर समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध-मुनगंटीवारसुधीर मुनगंटीवार यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाजाची सेवा करण्याचा संकल्प आमच्या सरकारने सतत जोपासला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसेवेचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ राज्यातील अनेक गावांमध्ये सभागृहांचे बांधकाम करण्यासाठी राज्य सरकारने मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध केला. त्यांचे प्रेरणादायी विचार गावोगावी पोहचविण्यासाठी या सभागृहाचा उपयोग होणार आहे. अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूद आम्ही केली. ज्या १३ योजना घोषित झाल्या त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. धनगर समाजातील तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी आपण विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार