शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; मुस्लीम समाजाच्या पाठीशी भाऊ म्हणून राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

मुस्लीम समाजातील भगिणींसाठी बचतगटांची निर्मिती करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी चळवळ आपण उभी केली आहे. सर्व भगिनींसाठी या विभागाचा आमदार म्हणून नाही तर त्यांचा भाऊ म्हणून सर्वशक्तीनिशी पाठीशी राहील, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांचे संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : या मतदार संघाचा विकास करताना, जिल्ह्याचा विकास करताना, राज्याचा विकास करताना मी कधीही जात, धर्म असा भेद बाळगला नाही. धर्म कोणताही असो, जात कोणतीही असो प्रत्येकाच्या रक्ताचा रंग हा लालच असतो. मुस्लीम समाजातील भगिणींसाठी बचतगटांची निर्मिती करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी चळवळ आपण उभी केली आहे. सर्व भगिनींसाठी या विभागाचा आमदार म्हणून नाही तर त्यांचा भाऊ म्हणून सर्वशक्तीनिशी पाठीशी राहील, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.बल्लारपूर शहरातील संत तुकाराम महाराज सभागृहात हाजी बांधवांचा सत्कार तसेच अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांच्या संमेलनात सुधीर मुनगंटीवार बोलत होते.यावेळी मंचावर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, परवीन मोमीन, शेख जुम्मन, उस्मानभाई, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, सज्जाद अली यांच्या मुस्लीम समाजाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थिते होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, नागपुरातील ताजुद्दीन बाबांच्या दरगाहसाठी आपण निधी उपलब्ध केला आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी औरंगाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ आपण निर्माण करीत आहोत. बल्लारपूर शहरात नाटयगृह, पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, स्टेडियम आदी विकासकामांसह कब्रस्तानसाठीसुध्दा आपण निधी उपलब्ध केला आहे. मुस्लीम समाजबांधवांची शादीखाना बांधण्याची मागणी आहे. ती मागणी आपण प्राधान्याने पूर्ण करू, अशी ग्वाही यावेळी मुनगंटीवार यांनी दिली.बहुमताचा कौल द्यावा- हाजी हैदर आजमशैक्षणिक कर्ज असो वा अन्य योजनांसाठी जेव्हा आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी निधी मंजूर केला. त्यांनी नेहमीच मुस्लीम बांधवांच्या हिताची भूमिका घेतली आहे. मुस्लीम समाजबांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना प्रचंड बहुमताचा कौल बहाल करावा, असे आवाहन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम यांनी यावेळी केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार