शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक विम्याचा लॉलीपॉप

By admin | Updated: May 29, 2015 01:44 IST

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे.

नांदाफाटा : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे. यासाठी कर्जाच्या आधारावर राष्ट्रीयकृत बँकामधून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमेतून चार ते सहा हजार रुपये दरवर्षी विम्याच्या नावावर कपात करण्यात येत आहे. मात्र याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकदा शेतकऱ्यांना अतिवृष्टी, रोग, अळी, पूर आदींचा सामना करावा लागतो. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र कृषी विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांना समाधानकारक माहिती मिळत नसल्याने बँक खात्यातून कपात करण्यात येत असलेल्या या पैशांचे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षी राष्ट्रीयकृत बँकामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी सातबाऱ्यावर अतिरिक्त बोजा चढविण्यात येत आहे. ज्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना बोझा चढवायची गरज नसल्याचे दिसते. याउलट शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पैशातून विम्यासाठीचे पैसे कपात केल्यामुळे पाहिजे तेवढ्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन धान, तूर यासारखी पिके नष्ट झाल्यानंतरही त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. शासनाने अतिवृष्टी, दुष्काळ, पुरबुडी आदींचे पॅकेज शेतकऱ्यांना याआधी वाटप केले आहे. यात सरसकट वाटप करताना काही शेतकऱ्यांचे लाभार्थी यादीत नावे आली नाही. त्यामुळे अनेकांना या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्याचप्रमाणे पिकाचे नुकसान होऊनही पीक विम्याचे पैसे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. दरवर्षी चार ते सहा हजार रुपये कपात होत असल्याने आर्थिक नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत बँकांमध्ये विचारणा केली असता काहीच न सांगता पैसे कपात करण्याचा शासनाचाच आदेश असल्याचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)