शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कार्यालयाला नागरिकांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:43 IST

मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही.

ठळक मुद्देग्राहक आक्रमक : मीटर रिंडींग चुकीचे होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील झोपडपट्टीवासींनी झोपडपट्टी विकास संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी कुलुप ठोकले होते. दरम्यान, तात्काळ समस्या दूर केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभियंता सचिन बदखल यांना निवेदनातून देण्यात आला आहे.मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दर महिन्याला युनीट तपासणी करण्यासाठी न येता घर बंद आहे, असे दाखवून अंदाजे युनिटवर बिल पाठवितात. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. वीज बिलाविषयी ग्राहक तक्रार करण्यास कार्यालयात गेल्यास समजावून न सांगता उद्दटपणाने वागतात, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे गरीब ग्राहक कार्यालयात जाण्यासाठी घाबरतात. हा अन्यास दूर करण्याच्या हेतुने सदोष मीटर तपासणीसाठी समिती नेमावी. नियमित वीज पुरवठा करताना ग्राहकांना चुकीचे बिल येऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक होते. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे. निवेदन देऊनही दखल घेतल्या जात नाही, असा आरोप करून कार्यालयाला कुलुप ठोकण्यात आला.आंदोलनाचे नेतृत्व झोपडट्टी संघटना अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी केले. आंदोलनात संघटनेचे रामेश्वर देवगडे, मनिष मोगरे, नजमुद्दीन सय्यद, लता इंदूरकर, शोभा अल्लीवार, मंगेश सोमूलकर, सचिन, नंदी वाघमारे आदींसह शेकडो वीज ग्राहक सहभागी झाले होते.प्रमुख मागण्या -शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाºया ग्राहकांचे मीटर दुरूस्त करावे.प्रामुख्याने याच परिसरातील ग्राहकांच्या मीटरचे रिंडींग योग्य पद्धतीने केल्या जात नाही. त्यामुळे वाजवीपेक्षा अधिक बिल येण्याचे प्रमाण वाढले. या परिसरात सर्वसामान्य ग्राहकांची संख्या अधिक आहे. चुकीचे बिल पाठविल्याने ते कदापि भरणे शक्य होत नाही.वीज मीटरमध्ये बिघाड झाल्यास तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी वीज कंपनीने या परिसरात कर्मचाऱ्यांना पाठवावे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण