शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दाढेतून ‘रोहण’ला मिळाले जीवनदान

By admin | Updated: July 5, 2017 01:04 IST

जन्मत: अज्ञान आजाराने त्रस्त असलेल्या आठ महिन्यांच्या रोहणच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची. उपचारासाठी पैसे नसताना मरणाच्या दारात असलेल्या रोहणला ...

मुनगंटीवारांच्या पत्राचा आधार : आठ महिन्यांच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रियालोकमत न्यूज नेटवर्कमूल : जन्मत: अज्ञान आजाराने त्रस्त असलेल्या आठ महिन्यांच्या रोहणच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची. उपचारासाठी पैसे नसताना मरणाच्या दारात असलेल्या रोहणला सेवाअभावी संस्था व ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राचा आधार मिळाला. त्यामुळे रोहण आज मृत्यूच्या दाढेतून बाहेर निघाला असून बालक सुखरुप आहे. मूल तालुक्यातील नागाळा येथील रोहण नामदेव भोयर असे बालकाचे नाव आहे. मूल तालुक्यातील नागाळा येथील नामदेव भोयर यांना आठ महिन्यांपूर्वी मुलगा जन्माला आला. तो जन्मत: वयोमानानुसार डोके शरीरापेक्षा मोठे असल्याने त्याला इतरत्र वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजार हा शस्त्रक्रियेविना होणार नसल्याने पैशाअभावी आई-वडीलाने हातवर केले. स्वत:चा प्रपंच भागविताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने लाखोंची रक्कम कुठून आणायची? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यानंतर त्यांनी रोहणच्या उपचाराकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावातील शिक्षिका एच. एस. वडेट्टीवार, शाळेचे शिक्षक जे.आर. मुस्कटे यांनी ही माहिती आरोग्य शिबिरात प्रमोद खोब्रागडे यांच्या लक्षात आणून दिली. पंचायत समिती मूल येथे कार्यरत वसीम काझी, सुप्रिया मेश्राम, संदीप सुखदेव या युवा कर्मचाऱ्यांनी जनसेवा ग्रामीण संस्था व शिक्षण परिषद यवतमाळ, टाटाट्रस्ट यांच्याकडे पाठपुरावा करुन नागपूर येथे शासकीय महाविद्यालयात रोहणला आणण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पत्र नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखास देण्यास आले. जनसेवा ग्रामीण संस्था, ना. मुनगंटीवार यांच्या पत्रामुळे रोहणवर शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला. मागील २६ जूनला रोहणवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. घरात अठराविश्व दारिद्र्य असलेल्या भोयर कुटुंबाला समाजातील चांगल्या व्यक्तीची साथ मिळाल्याने रोहणला नवीन जीवन मिळाले आहे. समाजात असे असंख्य रोहण असतील, त्यालाही समाजातील व्यक्तींनी आधार दिला तर मृत्यूच्या दाढेत असलेल्या बालकांना सुद्धा नवजीवन देता येईल.जन्मत: आजार असतानाही परिस्थितीअभावी आई-वडील रोहणवर उपचार करू शकले नाही. मात्र त्यांना ना. मुनगंटीवार आणि सामाजिक संस्थाचा आधार मिळाला. रोहणवर वेळीच उपचार मिळाल्याने तो आता बरा होणार आहे.