शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

पेपरमिल कॉलनीत बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

पेपरमील स्लज गार्डनला लागूनच जंगल परिसर व डी.आर. क्वार्टर्सच्या बाजूला झुडपी जंगल असल्यामुळे स्लज गार्डन व बांबू यार्डच्या मार्गाने बिबट या झुडपात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याने वसतितील बकरी व गायीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अंधारात घराबाहेर निघणे बंद केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील पेपर मिल जुन्या कॉलनीतील डी.आर. क्वार्टर्स परिसर व गोकुलनगर भागात १५ दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.पेपरमील स्लज गार्डनला लागूनच जंगल परिसर व डी.आर. क्वार्टर्सच्या बाजूला झुडपी जंगल असल्यामुळे स्लज गार्डन व बांबू यार्डच्या मार्गाने बिबट या झुडपात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याने वसतितील बकरी व गायीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अंधारात घराबाहेर निघणे बंद केले आहे. याबाबत वसाहतीतील नागरिकांनी बिल्ट व्यवस्थापन व वनविभागाकडे तक्रार केली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात बिबट्याचा संचार सुरू असल्याचे मान्य केले. परिसरातील पाहणी दरम्यान काही मांस विक्रेत्यांनी टाकण्यात येणारा मांस व मोकाट कुत्र्यांमुळे जंगलातील जनावरांना इथे सहज शिकार उपलब्ध होते. त्यामुळे बिबट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.नगर पालिकेतर्फे अशा विक्रेत्यांना त्या परिसरात मांस न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. पेपरमील व्यवस्थापनाला क्वार्टरच्या परिसराभवती तारेचे कुंपन व योग्य असे प्रकाश दिव्याची सोय करण्याचे निर्देश वनविभागातर्फे देण्यात आली. सोबतच बिबट्याला लवकरच जेरबंद करण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांनी दिली.परिसरात पाच कॅमेरेवनविभागाकडून या परिसरात पाच कॅमेरे लावून बिबट्याच्या हालचाली टिपल्या जात आहे. वसाहतीत एक वनरक्षक, दोन मजुरांसह नियमीत गस्त व फटाके फोडून उपाययोजनाही सुरू केली. जेसीबीद्वारे कचरा काढला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, सावध राहावे, अशा सूचना वन विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :leopardबिबट्या