शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

आकापूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ, नागरिक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:01 IST

मागील आठवड्यात गंगासागर हेटी येथील गोठ्यात शिरून बिबट्याने आठ बकऱ्या फस्त केल्या. ही घटना ताजी असताना आता आकापुरातही बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जवळच्याच देवपायली येथील बिबट्याने एका युवकाला जखमी केले होते. वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आता आकापुरात एका बिबट्याचा वावर वाढला आहे. ऐन शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

ठळक मुद्देदोन बकऱ्या व कुत्र्याला केले ठार : वनविभागाने परिसरात पिंजरे लावून वाढविली गस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील आकापूर गावालगत बिबटाचा धुमाकूळ सुरूच आहे. शनिवारी सायंकाळ्च्या सुमारात बिबटाने भाकरे यांच्या दोन बकऱ्या आणि एका कुत्र्याला ठार केले. बिबटा अजूनही झुडुपातच दडल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने परिसरात पिंजरे लावून गस्त वाढविली आहे.मागील आठवड्यात गंगासागर हेटी येथील गोठ्यात शिरून बिबट्याने आठ बकऱ्या फस्त केल्या. ही घटना ताजी असताना आता आकापुरातही बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जवळच्याच देवपायली येथील बिबट्याने एका युवकाला जखमी केले होते. वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आता आकापुरात एका बिबट्याचा वावर वाढला आहे. ऐन शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास बिबटाने आकापुरातील सुभाष आत्राम यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबटाने गोठ्याला जखमी करून तेथून धुम ठोकली. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरे लावले आहेत. वनविभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत आहे. बिबट्ट्याला जेरबंद करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले नाही. माहिती मिळताच क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी तातडीने आकापूर घटनास्थळाला भेट दिली. अधिकाऱ्यांना कॅमेरे व पिंजरा लावण्याची सूचना केली. मृत बकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने मदत करावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.शेतीची कामे प्रभावितनागभीड तालुक्यातील अनेक गावे जंगलाला लागून आहे. त्यामुळे गावाच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर नवीन नाही. मात्र वाघ व बिबटे गावाच्या परिसरात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या शेतीची कामे सुरु आहेत. शिवारातही वाघ व बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतीची कामे कशी करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :leopardबिबट्या