शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

हृदय रोगावर व्याख्यान

By admin | Updated: May 31, 2015 01:57 IST

पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने नुकतेच पंजाबी समाज सेवा समितीच्या हॉलमध्ये माधवबाग येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे हृदय रोगावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

चंद्रपूर : पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने नुकतेच पंजाबी समाज सेवा समितीच्या हॉलमध्ये माधवबाग येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे हृदय रोगावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाने पंजाबी समाज सेवा समितीच्या बहुतांश बांधवांनी लाभ घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माधवबाग येथील तज्ज्ञ डॉ. प्रमोद चव्हाण, पंजाबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष पी.एम. साहनी (कुक्कु), नगरसेवक अंजली घोटेकर, समितीचे कोषाध्यक्ष विनोद कत्याल, सचिव सुरेश शर्मा, उपाध्यक्ष नरेश अनेजा यांची उपस्थिती होती.सर्वात प्रथम मनपा नगरसेवक अंजली घोटेकर यांचे समितीचे उपाध्यक्ष नरेश अनेजा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात शित शवपेट्यांचे नगरवासीयांसाठी लोकार्पण करण्यात आले. पंजाबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष पी.एम. साहनी आपल्या संबोधनपर भाषणात म्हणाले, समितीच्या वतीने समाजासाठी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून हृदय रोगावर व्याख्यान तथा शित शवपेट्यांचे पाहुण्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी रक्तदान, नेत्र चिकित्सा-मोतीबिंदुचे आॅपरेशनसारखे कार्यक्रम घेण्यात आले. या अंतर्गत गरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना समितीच्या वतीने दत्तक घेऊन त्यांचे दायित्व स्विकारण्यात येईल.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवबाग येथील डॉ. प्रमोद चव्हाण होते. त्यांनी आपल्या भाषणात हृदय रोगावर विस्तृत माहिती दिली. नगरसेवक अंजली घोटेकर म्हणाल्या, पंजाबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष पी.एम. साहनी यांनी एका वर्षापासून लोकोपयोगी कार्य केलेले आहे. समितीचे सचिव सुरेश शर्मा यांनी प्रास्ताविक केले. पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष पी.एम. साहनी, सहसचिव गौरव खोसला, रवी कत्याल यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे, प्रीती सरबेरे, संघमित्र बुटके तथा मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व संचालन सुरेश शर्मा यांनी केले. आभार कुक्कु साहनी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)