शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना डोस घेण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचीच आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

राज्यात १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरू झाली. लसीकरणासाठी जिल्ह्यात २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये एससीडब्ल्यू १७ हजार ३४१, एफएलडब्लू श्रेणीतील ८ हजार ८०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत १६ हजार ३३७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यात ब्रह्मपुरी, भद्रावती, चंद्रपूर जीएमसी, चंद्रपूर ग्रामीण व चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती.

ठळक मुद्देफ्रन्ट लाईन वर्कर मागेच : मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ७२ टक्के लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी (एससीडब्ल्यू) मंगळवार (दि. १६) पर्यंत राज्यात आघाडी (७२ टक्के) घेतली. ३५ जिल्ह्यांमध्ये केवळ चंद्रपूर व पालघर या दोन जिल्ह्यांनाच एवढे उद्दिष्ठ गाठता आले. मात्र, शासनाच्या अन्य विभागातील एफएलडब्लू म्हणजे फ्रन्ट लाईन वर्कर अद्याप मागेच (४३ टक्के) असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या या कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.राज्यात १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरू झाली. लसीकरणासाठी जिल्ह्यात २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये एससीडब्ल्यू १७ हजार ३४१, एफएलडब्लू श्रेणीतील ८ हजार ८०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत १६ हजार ३३७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यात ब्रह्मपुरी, भद्रावती, चंद्रपूर जीएमसी, चंद्रपूर ग्रामीण व चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. अन्य तालुक्यातील केंद्रांतील लसीकरणाचा वेग अजुनही वाढला नाही. त्यातही फ्रन्ट लाईन वर्करर्स माघारले. आरोग्य कर्मचारी श्रेणीत मात्र चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेतली. मंगळवार (दि. १६) पर्यंत संपूर्ण राज्यात फक्त चंद्रपूर व पालघर या दोनच जिल्ह्यात ७२ टक्के लसीकरण झाले. 

एफएलडब्लू मागे राहण्याचे कारण काय ?आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेण्यात अगदी सुरूवातीपासूनच पुढे आहेत. आरोग्य क्षेत्रातील नवीन बदलांना तातडीने प्रतिसाद देऊन उत्साहाने रूग्णांना सेवा देतात. मात्र, पोलीस व शासनाच्या विविध विभागातील फ्रन्ट लाईन कर्मचाऱ्यांकडून लस घेण्याचा वेग वाढला. ८ हजार ७०४ पैकी ३ हजार ७३६ जणांनी लस घेतली. ४ हजार ९६८ जण शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांची धास्ती कशाची, याचा शोध घेऊन तातडीने समुपदेशन करण्याची गरज असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले.

९ हजार ९९०४ कर्मचाऱ्यांचे डोस शिल्लकजिल्ह्यातील १७ लसीकरण केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या दोनही श्रेणीतील २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांपैकी सोमवारपर्यंत १६ हजार २३७ जणांनी लस घेतली. ९ हजार ९९०४ कर्मचाऱ्यांचे डोस शिल्लक आहेत.