अडकलेल्या प्रवाशांसाठी लालपरी धावून जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:37+5:30

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाने परिपत्रक काढून सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यभरात नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी राहणारे विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी एसटी बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत.

Lalpari will run for the stranded passengers | अडकलेल्या प्रवाशांसाठी लालपरी धावून जाणार

अडकलेल्या प्रवाशांसाठी लालपरी धावून जाणार

Next
ठळक मुद्देचंद्रपूर बस आगराचे नियोजन शासन नियमानुसार प्रवासाची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यभरात अडकलेल्या विद्यार्थी, मजूर व नागरिकांच्या घरवापसीसाठी प्रशासनाने मार्ग खुला केला आहे. त्यांना रीतसर परवानग्या देण्यात येत आहे. खासगी वानधारकांकडून होणारी प्रवाशांची लूट लक्षात घेता महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाने परिपत्रक काढून सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यभरात नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी राहणारे विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी एसटी बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत. ज्या गावात, शहरात प्रवासी जाण्यास तयार होतील, तिथेच बस सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊ न प्रवासाचा मार्ग आणि शेवटचे ठिकाण ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवासामध्ये कुठेही बस थांबणार नाही. त्यामुळे एका ठिकाणाहून निघालेली बस ठरविलेल्या शहर, गावातच थांबेल, वाटेमध्ये कोणत्याही प्रवाशास उतरण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
चंद्रपूर विभागाकडून सर्वच आगारांमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. आगारात विचारणा करणाऱ्या प्रवाशांची नोंद घेऊ न गट तयार केल्या जाईल. तसेच जिल्हा प्रशासनाकडे प्रवासाच्या परवानगीसाठी केलेल्या अर्ज आणि त्यांच्या वाहतूक व्यवस्थेबद्दलच्या नोंदीवरून एसटी प्रशासन नियोजन करणार आहे.
यासाठी चंद्रपूर आगाराचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, आगार व्यवस्थापक स. ब. डफळे, राजुरा आगार व्यवस्थापक आ. म. मेश्राम, चिमूर राकेश बांधे, वरोरा प्रितीश रामटेके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बस आगारातर्फे करण्यात आले आहे.

राज्याबाहेर व बाहेर जिल्ह्यात कामगार, विद्यार्थी, अडकले आहेत. शासनाने काही अटी शर्ती घालून अडकलेल्या विद्यार्थी कामगारांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली आहे. प्रवास करू इच्छिणाºया प्रवाशांकरिता एसटीने कक्ष स्थापन केले आहेत. प्रवाशांनी राज्य परिवहन विभागाच्या कक्षाशी संपर्क साधून माहिती द्यावी.
- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

पुणे येथील अडकलेल्या नागरिकांना आणणार
पुणे येथे अडकलेल्यांना आणण्यासाठी साधारत: शंभर बसेसची तयारी केली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बस सॅनिटाईज करुन रवाना करणार आहेत. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सुचनेनुसार ठिकाठिकाणच्या विद्यार्थ्यांना घेऊन बस चंद्रपूरला आणण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सचिन डफळे यांंनी दिली.

जिल्ह्यात अडकलेल्या व आपल्या मूळ गावी परताण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना गावांकडे परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. या करिता तहसील स्तरावरून नोंदणी व वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

२१ प्रवाशांचा गट तयार झाल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची यांदी एसटी विभागास प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात देण्यात आली आहे.

प्रवास करणाऱ्यांना घ्यावयाची काळजी
इच्छुक स्थळी जाण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या परवानगीचे पत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, प्रवासात अनुमती दिलेले पत्र गरजेचे आहे.
त्यासाठी प्रवास करू इच्छिणाºयांनी अगोदर नोंदणी करून नंतर एसटी महामंडळाशी संपर्क साधावा. प्रवासामध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. बसमध्ये बसण्यापूर्वी हात सॅनिटाइज करणे अथवा स्वच्छता धुवूनच बसमध्ये चढता येईल.
प्रशासनातर्फे खबरदारी
एसटी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येणार आहे. दुरूस्त बसेस पाठविणे, प्रवास सुरू होण्यापूर्वी संपूर्ण बस निर्जंतुकीकरण करण्यात येऊ न प्रवासी सोडल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासासाठीही बस स्वच्छ व निर्जंतुक केली जाईल. लांब पल्ल्याच्या बससाठी मुबालक इंधन, नादुरूस्त बस देण्यास प्राधान्य दिले जाईल.

Web Title: Lalpari will run for the stranded passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.