शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशी शिक्षक करतात मजुरी

By admin | Updated: December 11, 2014 23:04 IST

गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय अनुदानाविना सुरू असलेल्या शाळांतील शिक्षकांची चांगलीच फरफट सुरू आहे. कधी तरी अनुदान मिळेल या आशेने विद्यादानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना आपली

जिवती : गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय अनुदानाविना सुरू असलेल्या शाळांतील शिक्षकांची चांगलीच फरफट सुरू आहे. कधी तरी अनुदान मिळेल या आशेने विद्यादानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सुटीच्या दिवशी फावल्या वेळात मजुरीला जावे लागत आहे.
शाळेची नियमित नोकरी करून वेळ मिळेल तेव्हा किंवा सुटीच्या दिवशी हे शिक्षक शेतीचे काम इतरांकडे मजुरी करतात. एवढेच नव्हे तर काही शिक्षक हॉटेलातसुद्धा काम करीत आहेत. विनाअनुदानीत शाळांवर काम करता करता अनेक शिक्षकांचे वय निवृत्तीच्या जवळ आले आहे. अनेक शिक्षकांनी चाळीशी ओलांडली असताना संसाराचा गाडा पुढे कसा रेटावा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. पगारी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापर्यंत पगार झाले नाही तर आंदोलने केली जातात. मग चौदा वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांनी कुणाकडे न्यायासाठी हात पसरावे? हा प्रश्न मन हेलावून टाकणारा आहे.
एखादा कर्मचारी आजारी पडला किंवा त्याच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर दवाखान्यात उपचार करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसतात. अशावेळी त्यांनी काय करावे? कामाचा मोबदला हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, पण या शिक्षकांच्या बाबतीत असे घडत नाही. शासन प्रत्येकवेळी या शिक्षकांच्या पदरी आश्वासनाची खैरात टाकते. पण देत काहीच नाही.
आजच्या स्थितीत विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेत काम करणारे शिक्षक २० हजारांच्या वरून आहेत. पण त्यांच्या पोटाचा प्रश्न अजुनही सुटला नाही.
आज हे कर्मचारी वेळ मिळेल तेव्हा एकत्र येतात. हिवाळी अधिवेशनात शासन सकारात्मक भूमिका घेईल का? या प्रश्नावर चर्चा करतात. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चौदा वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनुदानाविषयी सकारात्मक भूमिका घेऊन समस्या सोडवाव्या, अशी मागणी आहे.
पूर्वी शिक्षक होण्यासाठी बेरोजगारांमध्ये स्पर्धा होती. तेव्हा शिक्षकांच्या जागाही मोठ्या प्रमाणावर भरल्या जायच्या. त्यातील काही बेरोजगार जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्यांना जिल्हा परिषदेची नोकरी मिळाली नाही, त्यांनी स्वत: लाखो रुपये डोनेशन देऊन खासगी संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकी पेशा स्विकारला. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र १४ वर्षांचा ‘वनवास’ भोगूनही अद्याप त्यांच्या नशिबी फरफटच आली आहे. (शहर प्रतिनिधी)