शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्या २५३ जणांची कोविड तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले.   बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट आहे. मात्र, काही व्यक्ती याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर निघत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू केली. चंद्रपूर ग्रामीण क्षेत्र, बल्लारपूर, राजुरा व चिमूर तालुकास्थळी मंगळवारी कारवाई झाली. घुग्घुस ५७ व पडोली येथे ६७ जणांची चाचणी झाली. 

ठळक मुद्देसात व्यक्ती पॉझिटिव्ह : थेट कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संचारबंदी असताना विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच अ‍ॅन्टिजन करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. मंगळवारी चंद्रपूर ग्रामीण क्षेत्र, बल्लारपूर, राजुरा, चिमूर,पडोली व घुग्घुस येथे एकूण २५३ जणांची तपासणी केली असता सात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. पोलीस, आरोग्य विभाग व नगरपंचायतच्या संयुक्त धडक मोहिमेमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले.   बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट आहे. मात्र, काही व्यक्ती याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर निघत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू केली. चंद्रपूर ग्रामीण क्षेत्र, बल्लारपूर, राजुरा व चिमूर तालुकास्थळी मंगळवारी कारवाई झाली. घुग्घुस ५७ व पडोली येथे ६७ जणांची चाचणी झाली. बल्लारपुरात सकाळी ८८ जणांची तपासणी केली असता पाचजण अहवाल पॉझिटिव्ह आढळले. राजुरा शहरात पंचायत समिती चौकात २८  जणांची झाली. चिमूर शहरात ५० नागरिकांची तपासणी झाली. त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आढळलेल्या सातही जणांना कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. 

पाच ठिकाणी झाली ॲन्टिजन चाचणी

- बल्लारपूर शहरात ही मोहीम तीन ठिकाणी राबविण्यात आली. ५१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.- राजुरा शहरात पंचायत समिती चौकामध्ये नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून एकाही व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आढळून आलेला नाही.- चिमूर शहरात बाजारपेठेलगत मुख्य रस्त्यावर ५० नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी दोन नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.- घुग्घूस येथे ५७ व पडोली येथे ५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस