वस्तु ज्ञानासाठी बच्चे कंपनी बाजारपेठेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:43+5:30

बालवयात केलेल्या संस्कार आणि दिलेल्या शिकवणीचा पुढील आयुष्यातील वाटचालीकरिता मदत होते. त्यामूळे बालकांना कच्चा मडक्यांची उपमा दिल्या गेली आहे. बालकांना परीसर, व्यवहार ज्ञान हे पुढील जिवनासाठी आवश्यक असते. यासाठी चिमूर येथील अंकुरम किड्झी स्कुलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास दौरा बाजारपेठेत काढण्यात आला.

Kids Company Market for Commodities Knowledge | वस्तु ज्ञानासाठी बच्चे कंपनी बाजारपेठेत

वस्तु ज्ञानासाठी बच्चे कंपनी बाजारपेठेत

ठळक मुद्देविद्यार्थ्यांत आनंद : व्यावहारिक ज्ञान

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : बंद वर्ग खोल्यांमधील शिक्षण आणि घोकंमपट्टी यावरच निर्भर न राहता बालकांना परीसर ज्ञान व निरीक्षणातून वस्तुची ओळख, त्याचे महत्व आदींच्य माहितीसाठी अंकुरम किड्झी स्कूलच्या चिमुकल्यांनी चिमूरच्या बाजारपेठेत प्रत्यक्ष जाऊन व्यवहार कसे चालतात याची माहिती जाणून घेतली.
बालवयात केलेल्या संस्कार आणि दिलेल्या शिकवणीचा पुढील आयुष्यातील वाटचालीकरिता मदत होते. त्यामूळे बालकांना कच्चा मडक्यांची उपमा दिल्या गेली आहे. बालकांना परीसर, व्यवहार ज्ञान हे पुढील जिवनासाठी आवश्यक असते. यासाठी चिमूर येथील अंकुरम किड्झी स्कुलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास दौरा बाजारपेठेत काढण्यात आला. बाजारपेठेत या बच्चे कंपनीला बाजारात मिळणाऱ्या सर्व प्रकारचा भाजीपाला व फळ भांज्याची ओळख करुन देण्यात आली. त्यांना त्यांच्या उपयोगीविषयी वस्तुंची ओळख करून  देण्यात आली.
बाजारपेठेत असलेल्या फंळाच्या दुकानातील उपलब्ध सर्व प्रकारच्या फंळाची ओळख निरोगी आरोग्यासाठी त्याचे फायदे या विषयी माहिती देण्यात आली. वर्ग खोल्यातील बंदिस्त शिक्षण व घोकमपट्टी सोडून बाजारपेठेत फिरून मिळालेल्या ज्ञानाने बच्चे कंपनी खुष झाली. उत्सुकतेने सर्व माहिती मिळवित असल्याचे चित्र होते. यावेळी विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका सुप्रिया सिंगरे, शिक्षिका विजयश्री सामृतवार, नेहा डवले, रेश्मा जाधव, अंजली कुडवे, आशा मेश्राम, जोत्स्ना चौधरी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Kids Company Market for Commodities Knowledge

टॅग्स :Schoolशाळा