शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कन्हाळगाव अभयारण्यमुळे वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

गोंडपिपरी : जिल्ह्यातील दक्षिणेकडील कन्हाळगाव हा सुरक्षित व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार, ...

गोंडपिपरी : जिल्ह्यातील दक्षिणेकडील कन्हाळगाव हा सुरक्षित व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वाघांचा भ्रमणमार्ग सशक्त होणार, असा दावा पयार्वरणवाद्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे या अभयारण्याला सूरवातीपासूनच काही गावांचा विरोध होता. अभयारण्य घोषित झाल्याने पारंपरिक वन हक्कांवर गदा आणू नका, अशी मागणी करू लागले आहेत.

तेलंगणातील कवल, इंद्रावती, टिपेश्वर ,ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा कन्हाळगाव व्याघ्र भ्रमणमार्ग आहे. या मार्गाने वाघांची भ्रमंती सूरू असते. कन्हाळगाव अभयार अंतर्गत कोठारी, तोहोगाव, कन्हाळगाव, धाबा वनक्षेत्राचा समावेश आहे. अभयारण्य घोषित झाल्याने व्याघ्र संवर्धनात मोठी भर पडणार, असा दावा वन अधिकारी करीत आहेत. राज्याचे माजी वनमंत्री सूधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने कन्हाळगाव अभयारण्याला १३ व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता मिळाली होती. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर शिक्कामोर्तब केले होते. अभयारण्यासाठी त्यावेळी २१० चौरस किलोमिटर क्षेत्र निश्चित केले होते. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मध्यचांदा वनविभाग व वन प्रकल्पाला ताडोबा प्रमाणेच महत्त्व आहे. कन्हाळगाव अभयारण्यात पर्यटकांचा ओघ वाढू रोजगार निर्मितीचे नवे दालन खुले होऊ शकते, असे वन विभागाकडून सांगितले जात आहे.

नागरिकांचा सूरवातीपासूनच विरोध...

कन्हाळगाव अभयारण्याला नागरिकांचा सुरवातीपासूनच विरोध होता. त्यात काही राजकीय नेत्यांनी अभयारण्याचा विषयाला हात घातल्याने विरोध अधिक तीव्र झाला होता. अभयारण्याबाबत नागरिकांची मते घेण्यासाठी १८ ग्रामपंचायती व गट ग्रामपंचाय अंगर्तत ३३ गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या. यात नागरिकांनी विरोधात मते मांडली होती.

अशा आहेत गावक-यांच्या मागण्या...

प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला अभयारण्यात रोजगार द्यावा, निस्तार हक्कांची गरज पूर्ण करावी, जंगलावरील गावाचा हक्क कायम ठेवावा, तेंदुपता संकलन हंगाम बंद करू नये, वन्यजीवापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी, स्थानिकांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी.