शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारच लोकशाहीचे संरक्षक- अहीर

By admin | Updated: June 10, 2014 23:58 IST

पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार

चंद्रपूर : पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी काढले. पंजाबी सेवा समितीच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ग्रामीण पत्रकारांच्या मेळाव्यात उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रमुख पाहुणे आमदार नाना श्यामकुळे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, संपादक संघाचे विदर्भस्तरीय अध्यक्ष डी.के. आरीकर, संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार होते. याप्रसंगी पत्रकार अमर बुद्धारपवार यांना स्मृतिशेष बाळकृष्ण पोटदुखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाकडून निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पत्रकारिता ही चौथी शक्ती असून पत्रकारांमुळेच राज्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभते. शासन, प्रशासनावर वचक निर्माण होतो, असेही ते म्हणाले. आमदार श्यामकुळे यांनी पत्रकारितेत प्रामाणिकपणा आणावा, बातमीची खातरजमा करूनच त्या प्रकाशित व्हाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रवीण बडकेलवार, डी.के. आरीकर यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्याचे अध्यक्ष किशोर पोतनवार यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांचे विदारक सत्य मांडले. ६० वर्षांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पेंशन योजना सुरू करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाने शिक्षक मतदार संघाप्रमाणे पत्रकारांचा मतदार संघ निर्माण करून विधानसभेत पत्रकारांना प्रतिनिधीत्व प्राप्त करून द्यावे, अशी मागणी केली.दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना याप्रसंगी आदरांजली अर्पण करण्यात आली. किरण बुटले यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक महासचिव राजेश सोलापन यांनी केले. सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या मेळाव्याला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सुरेश तावाडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)