तेलगू बांधवांच्यावतीने जोरगेवार यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:47+5:302021-06-22T04:19:47+5:30

चंद्रपूर : घुग्घुस येथे तेलगू समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तेलगू समाज बांधवांच्यावतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार ...

Jorgewar felicitated on behalf of Telugu brothers | तेलगू बांधवांच्यावतीने जोरगेवार यांचा सत्कार

तेलगू बांधवांच्यावतीने जोरगेवार यांचा सत्कार

चंद्रपूर : घुग्घुस येथे तेलगू समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तेलगू समाज बांधवांच्यावतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील विविध समस्यांवरही शिष्टमंडळाने चर्चा केली. दरम्यान, बल्लारपूर येथे समाजभवन बांधून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी कल्लाकार मल्लारप, घुग्घुस तेलगू समाजाचे अध्यक्ष राम्मीला आनंद, शंकरया काडसी, प्रेम गंगाधरे, सुनील मेद्दपल्ली, अरुण मिटपल्ली, बल्लारपूर येथील लक्ष्मी नरसिंह बॅंकेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, बल्लारपूरचे नगरसेवक स्वामी रायबरम, ज्येष्ठ नागरिक जी. डी प्रथुदास, नानाजी बुंदेल, श्रीनिवास, मिलिंद दिंडेवार आदींची उपस्थिती होती. घुग्घुस येथे तेलगू समाज भवनासाठी खनिज विकास निधीतून ३० लक्ष रुपयांचा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करून दिला आहे. या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी तेलगू समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चंद्रपूर, घुग्घुस आणि बल्लारशाह येथील तेलगू समाजबांधवांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच बल्लारपुरातही तेलगू समाजभवन बांधून देण्याची मागणी केली. आमदार जोरगेवार यांनी घुग्घुसनंतर आता लालपेठ येथेही तेलगू समाज भवन बांधणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी समाजातील विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली.

Web Title: Jorgewar felicitated on behalf of Telugu brothers