शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईने होरपळतोय जिवती तालुका

By admin | Updated: March 21, 2016 00:40 IST

चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुका म्हटले तर पाणीटंचाई पुजलेलीच. असा एकही वर्ष नाही की, या तालुक्यात पाणी टंचार्ई नाही.

पाण्यासाठी पायपीट : गढूळ पाण्यावर जगतात जनावरेसंघरक्षीत तावाडे  जिवती चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुका म्हटले तर पाणीटंचाई पुजलेलीच. असा एकही वर्ष नाही की, या तालुक्यात पाणी टंचार्ई नाही. दरवर्षी पाऊस पडत असला तरी हा तालुका उंच अशा पहाडावर वसला असल्याने पावसाचे पाणी पडते तसाच पहाडावरून घसरून निघून जाते. पाणी अडावे यासाठी नाल्यावर बांध नाहीत किंवा तलावही नाहीत. परिणामी उन्हाळ्यात महिलांना पायपीट करावी लागत आहे.जिवती तालुक्यातील अनेक गावात पाण्याचे स्रोत जरी असले तरी त्यात पाण्याचा साठा नसल्याने गावकऱ्यांना विशेष करून महिलांना गावाबाहेरील एखाद्या शेतातील विहिरीतून किंवा नाल्यातील पाणी डोक्यावर वाहून आणावे लागते. नाले किंवा तलावातील पाणी सध्या कमी झाल्यामुळे जनावरांना मिळेल तेथील गढूळ पाणी पिऊन आपली तहाण भागवावी लागत आहे.लोकप्रतिनिधी असो वा प्रशासन, यांचे नेहमीच जिवती तालुक्याकडे दुर्लक्ष राहिले आहे. नेहमी पाण्याची बोंब असताना तालुक्यातील जनतेला पाण्याची सोय करून देऊन पाणी पाजणारा खंबीर वाली मिळालेला नाही. नेहमी टँकरमुक्त तालुका करू असे म्हणणारे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी हे पाणीटंचाईमुक्त तर सोडाच, पण मंजूर टँकरसुद्धा पाठवत नाहीत, ही येथील जनतेसाठी शोकांतिका आहे. तालुक्यात गावाची संख्या ८३ आहे. त्यापैकी आजच्या घडीला १७ गावे ही पाणीटंचाईने होरपळत आहेत. अनेक आदिवासी गावात पाण्याची साधने नसल्याने एक ते दोन किमी अंतरावरून डोक्यावर किंवा बैलबंडीवरून पाणी आणावे लागते आहे. हातपंपाच्या बाबतीत ३५ ग्रामपंचायतीपैकी २८ ग्रा. प. कडे पाणी कराचे ८ लाख ४५ हजार रूपये थकबाकी होते. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार रूपये ग्रा.पं. ने भरले आहे. अजूनही ५ लाख रुपये बाकी असल्याने ही रक्कम आल्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे.जलस्वराज्य योजना कुचकामीतालुक्यात जलस्वराज्य योजनेतंर्गत गावांना पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने शासनाने अनेक गावात योजना राबविली. पण गेल्या काही वर्षांपासून ही योजनाच बंद आहे. जिवती, लोलडोह, पुडियाल, मोहदा किंवा अन्य दोन-चार गावे सोडली तर ही योजना बाकी गावात फेल ठरली आहे. या योजनेतंर्गत कुठे टाकी तर कुठे विहीर तर कुठे केवळ पाईपलाईन टाकून अर्धवट कामे ठेवल्याचे दिसत आहे.२८ गावातील हातपंप नादुरूस्ततालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसुलीकडे कानाडोळा केला आहे. परिणामी थकबाकीचा आकड्याचा डोंगर वाढत चालला आहे. पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने वसुली न देणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा खंडीत करायचा, सोबतच बंद असलेली हातपंप दुरूस्त करायचा नाही. टंचाईच्या काळात घेतलेल्या या निर्णयाने पाणी टंचाईला आणखी ग्रहण लागलेले आहे.अधिकाऱ्यांकडून टंचाईग्रस्त गावांना भेटीपंचायत समितीचे उपसभापती सुग्रीव गोतावळे व संवर्ग विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना गेल्या महिनाभरापासून भेटी देत आहेत. पाणीटंचाई वाढत असताना यांच्या भेटीने गावकऱ्यात आपुलकी निर्माण होत असून पाणी समस्या सोडविण्यासाठी ते काय उपाययोजना करतात, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.