शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकांवर चणे, फुटाणे, पाणी विकणाऱ्यांचे जगणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:26 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात सर्वच प्रवासी साधने बंद करण्यात आली नसली तरी या साधनांवर ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात सर्वच प्रवासी साधने बंद करण्यात आली नसली तरी या साधनांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. नागभीड येथे जुना बसस्टाॅप, नवीन बसस्थानक आणि राम मंदिर चौक या बसस्थानकांवर प्रवाशांची पूर्वी नेहमीच गर्दी दिसायची. शेकडो वाहनांची नेहमीच वर्दळ दिसायची. या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चणे, फुटाणे, बिस्कीट, शेंगदाणे व अन्य मोसमी वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी होती. या तिन्ही बसस्थानकांवर किमान १५ ते २० व्यक्ती आपली सेवा देण्यासाठी नेहमीच तत्पर असायचे. बस, खासगी ट्रॅव्हल्स आणि अन्य प्रवासी साधने बसस्थानकानजीक आली की, मागचा पुढचा कोणताही विचार न करता मी त्या वाहनाजवळ अगोदर पोहोचलो पाहिजे व मला ग्राहक मिळाले पाहिजे, या इच्छेने जिवाची बाजी लावून या व्यक्ती त्या वाहनाजवळ पोहोचायच्या आणि आपल्या वस्तूंची ‘मार्केटिंग’ करून वस्तू विकायच्या. मात्र, सद्य:स्थितीत लॉकडाऊनमुळे वाहनेच येत नसल्यामुळे या बसस्थानकांवर प्रवाशीच दिसत नाहीत. प्रवासीच नसल्यामुळे या विक्रेत्यांना ग्राहकच नाहीत. यातील बहुतेकांचा यावरच उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, आता त्यांचा ‘धंदा’च बंद झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

लग्न समारंभ, शाळा, महाविद्यालयेही बंद

प्रवाशांसोबतच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थीही या विक्रेत्यांचे मोठे ग्राहक होते. नागभीड येथील शाळा महाविद्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. हे विद्यार्थी बसस्थानकांवर आल्यानंतर या विक्रेत्यांकडून वस्तू विकत घेत होते. आता शाळा, महाविद्यालये बंद असल्याचा फटका या विक्रेत्यांना बसला आहे. याशिवाय लग्न समारंभ, सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आल्याने नागारिकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. याचाही परिणाम या विक्रेत्यांवर झाला आहे.