शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
5
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
6
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
8
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
9
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
10
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
11
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
12
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
13
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
14
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
15
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
16
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
17
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
18
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
19
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
20
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

प्रकल्पबाधित युवकांना वीज केंद्रातील कंत्राटी कामात सामावून घ्यावे

By admin | Published: February 11, 2016 1:32 AM

वीज केंद्रातील निर्माणाधीन संच कार्यान्वित झाल्यावर ते व्यवस्थापनाकडे संचालनाकरीता हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

दोन नव्या संचाचे बांधकाम : स्थानिकांवरील अन्याय दूर करण्याची मागणीदुर्गापूर : वीज केंद्रातील निर्माणाधीन संच कार्यान्वित झाल्यावर ते व्यवस्थापनाकडे संचालनाकरीता हस्तांतरित करण्यात येणार आहेत. दरम्यान करण्यात येणाऱ्या कंत्राटी कामात दुर्गापूर, ऊर्जानगरातील स्थानिक प्रदूषण व प्रकल्प बाधित सुशिक्षित बेरोजगारांना आधी प्राधान्य देऊन यात सामावून घेण्याची मागणी येथील नागरिकांची केली आहे.चंद्रपूर वीज केंद्रातील दोन नव्या संचाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्णत्वास आल्यावर संचालनाकरीता वीज केंद्र व्यवस्थापनास हस्तांतरीत करण्यात येणार आहे. संचाचे संचालन वीज केंद्राच्या कर्मचाऱ्याशिवाय कंत्राटी पद्धतीने कामाचे कंत्राट काढून कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगाराकडून करण्यात येणार आहे. याकरीता शेकडो कामगारांची गरज भासणार आहे. अशा कामगारांची दुर्गापूर-ऊर्जानगर (वस्ती) मधील प्रकल्पग्रस्त व मूळ निवासी असलेल्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांची भरती करण्याची गरज आहे. यापूर्वी वीज केंद्राच्या सातही संचामध्ये केलेल्या कंत्राटी कामगारांच्या भरतीत येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे आपल्या अंगणात असलेल्या वीज केंद्रात आपल्यालाच काम मिळत नसल्यामुळे येथील युवक वर्ग संतापला आहे.परराज्यातून व पर जिल्ह्यातून येवून येथे बस्तान मांडलेले काही संधी साधू नेते मूळ निवासा व्यतिरिक्त लोकांकडून आधीच पैसे लाटून या कंत्राटी कामात सामावून घेण्याची त्यांना हमी देत आहेत. मात्र सात संचाच्या कंत्राटी कामात मूळ निवास्यांवर झालेला अन्याय आता या संचाच्या कंत्राटी कामात होणाऱ्या कामगार भरतीत खपवून घेणार नसल्याने बोलल्या जात आहे. येथील दोन्ही ग्रामपंचायतीने संयुक्तरीत्या मुख्य अभियंत्यांना पत्र देऊन तशी आगाऊ मागणी केली आहे. यास त्यांनी आपली समर्थता दर्शविली आहे. सर्व समीप प्रकल्प बाधित सर्वाधिक प्रदूषणाची झळ सोसाणाऱ्या दुर्गापूर-ऊर्जानगरातील मूळ बेरोजगारांना कामगार भरतीत प्रथम प्राधान्य देण्याची एक अट मेन्टनन्स कामाच्या निघणाऱ्या निविदामध्येच टाकण्यात यावी, अशीही मागणी आहे. (वार्ताहर)