घुग्घुस : घुग्घुस येथील शुभम अपहरण व हत्या प्रकरणात आरोपीकडून फेकलेला मोबाइल मिळाला. याप्रकरणाची चौकशी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात पाच तास स्वत: केली. मात्र अजूनही हत्या का केली, याबाबत कोणत्याही प्रकारचे धागेदोरे गवसले नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}बुधवारी आरोपीच्या पोलीस कोठडीचा अंतिम दिवस असल्याने आजही पोलिसांनी कसून चौकशी केली.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आरोपीकडून चौकशी सुरू राहणार आहे. या प्रकरणी शुभमच्या मित्रांना मंगळवारी दुपारी २ वाजता बोलाविले आणि रात्रीपर्यंत बसवून ठेवले होते. त्यामुळे त्यांचीसुद्धा मानसिकता खराब होत आहे. पोलीस आरोपीकडून विचारपूस करीत असली तरी अजूनही घटना कशी व कशासाठी याचा उलगडा झाला नाही.