शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

भारत निर्माण योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: February 1, 2015 22:54 IST

भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या धूळ खात उभ्या आहेत.

बेंबाळ : भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उभ्या केलेल्या पाण्याच्या टाक्या धूळ खात उभ्या आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांत सन २००८ मध्ये उभारण्यात आलेले पाण्याच्या टाक्या अजूनपर्यंत पाण्याविना डौलाने उभ्या आहेत. कोणत्याही प्रकारची पाईपलाईन त्यांना जोडण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत गावागावांत पाणी पुरवठा करण्यासाठी जी कामे हाती घेण्यात आली, ती सात वर्षे उलटूनही पूर्णत्वास गेलेली नाही. या टाक्या उभारण्याकरिता लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. भारत निर्माण योजनेंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा नळयोजना ही सन २००८ मध्ये संतोषसिंग रावत हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अंमलात आणण्यात आली. तत्कालिन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालिन उपअभियंता मडावी यांच्या प्रयत्नातून ही योजना साकार झाली आहे. मात्र या योजनेकडे आजही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कित्येक गावात पाण्याची टंचाई व त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ बसणार आहे. हा विषय निकाली काढावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)