शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेल आजाराचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 22:47 IST

जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण

चंद्रपूर : जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण या आजाराने बाधित आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.२००९ ते आॅगस्ट २०१४ च्या आकडेवारीनुसार २० हजार ३६० एएस सिकलसेलचे रुग्ण, तर एसएसचे २ हजार १४ रुग्ण आहेत. यात महिला व पुरुषांचा समावेश आहे. वाहन व्यक्ती पुढच्या पिढीला सिकलसेलचा आजार देऊ शकतात. पण त्यांचे प्रमाण खूपच कमी असते. याला पिडीत व्यक्तीसारखा त्रास होत नाही. मात्र दोन्ही वाहक व्यक्तीने विवाह केला तर त्यापासून जन्माला येणारी संततीला सिकलसेल होऊ शकतो. मागील वर्षात सिकलसेलमुळे ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.रक्ततपासणीतून या आजाराचे निदान करता येते. या रुग्णांना आयुष्यभर औषधोपचार करावे लागतात. हा आजार आनुवंशिक असल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिकलसेलविषय अनेक गैरसमज समाजात पसरले आहे. ते दूर होणे गरजेचे आहे. या आजाराविषयीच्या जनजागृतीसाठी आरोग्य विभागातर्फे गावस्तरावर शिबिर घेतली जातात. शिबिरात रक्तचाचणीही होते. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही कामे केली जातात. १९ जून हा जागतिक सिकलसेल दिन असतो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्यात येतात. जिल्ह्याची लोकसंख्या २४ लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल रक्त चाचणी करुण घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. जर १०० व्यक्तींची रक्तचाचणी केल्यास तीन आजारी व्यक्ती तर १५ वाहक व्यक्ती असू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्येकांनी चाचणी करून औषधोपचार सुरु करावा, अशी विनंती करण्यात आली. आहे. (नगर प्रतिनिधी)