शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

सोशल मीडिया लहान-थोरांपासून ज्येष्ठांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट मिळविण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसून येतात. आता तर वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेऊन केक कापताना किंवा हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकण्याचे फॅड वाढत आहे. मात्र, असे प्रकार अनेकांच्या अंगलट येत असून जेलची हवा खावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट मिळविण्याच्या नादात अनेकजण तलवारीने केक कापताना किंवा हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ व्हायरल करण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अशा प्रकाराचे व्हिडिओ अंगलट येऊन व्हिडिओ टाकणाऱ्यांना जेलची हवा खावी लागत आहे.  सोशल मीडिया लहान-थोरांपासून ज्येष्ठांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट मिळविण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसून येतात. आता तर वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेऊन केक कापताना किंवा हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकण्याचे फॅड वाढत आहे. मात्र, असे प्रकार अनेकांच्या अंगलट येत असून जेलची हवा खावी लागत आहे. त्यामुळे केवळ लाईक्स व कमेंट्सच्या उत्सुकतेपोटी व्हिडिओ करणे टाळावे.

तलवारीने केक कापण्याची फॅशनमित्रमंडळीत एखाद्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकजण केक कापताना चाकूऐवजी तलवारीचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यानंतर हातात तलवार घेऊन नाचताना व्हिडिओ बनवितात. सध्या अशी फॅशनच झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, हे प्रकार चुकीचे असून पोलिसांना कळल्यास आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

बल्लारपुरात गुन्हा दाखलवाढदिवसाचा केक तलवारीने कापून व्हिडिओ व्हायरल करण्याप्रकरणी नुकताच बल्लारपूर येथे आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तलवार जप्त करण्यात आली आहे. तसेच हातात शस्त्र घेऊन दहशत पसरविण्याचा व्हिडिओसुद्धा पसरविणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली. 

कट्टा, तलवार अन् चाकूनव्यानेच तारुण्यात आलेले अनेकजण हातात बंदूक, तलवार आणि चाकू बाळगत आहेत. शस्त्र हातात घेऊन ते आपली छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत. अशाप्रकारे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आहेत.

कमेंट करताना काळजी घ्यावीसोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्या गुंडांच्या पोस्टला लाईक किंवा त्यावर कमेंट करणारेसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारच्या वादगस्त व भाईगिरीच्या पोस्टला लाईक किंवा शेअर करताना काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या पोस्टपासून दूर असलेलेच बरे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी