शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपाययोजनांची व्याप्ती वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

आतापर्यंतच्या १५ दिवसात ज्याप्रमाणे कोरोनापासून बचावाच्या आपण यशस्वी ठरलो. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मनपाने नागरिकांच्या बचावासाठी उपाययोजनांची व्याप्ती वाढवावी, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या. मनपा अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : शहरासह जिल्ह्यात एकाही व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण होऊ नये, याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. आतापर्यंतच्या १५ दिवसात ज्याप्रमाणे कोरोनापासून बचावाच्या आपण यशस्वी ठरलो. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मनपाने नागरिकांच्या बचावासाठी उपाययोजनांची व्याप्ती वाढवावी, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या. मनपा अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी आदी उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले, देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही रूग्ण आढळला नाही, ही समाधानाची बाब आहे. मात्र, या भीषण समस्येपासून यापुढेही बचाव करण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. लॉकडाऊनमध्ये संकटात अडकलेल्या नागरिकांना सरकारकडून मदत केल्या जात आहे. सामाजिक संघटनांनीही याकरिता पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले. रस्त्यावर विकणाºया भाजीपाला व फळ विक्रेत्यांना मास्क व सॉनिटायझर वितरित करावे, कोहिनुर तलावात भाजी मार्केटला अडचणी येत असेल तर चांदा क्लब सुरू करावा, गर्दीमुळे सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन होणार नाही. घंटागाडी व वार्डात भाजी विक्री करणारे हातठेलेधारकांसाठी सकाळी ८ ते ११ अशी वेळ ठेवण्याचा विचार करावा, अशा सूचना खासदार धानोरकर यांनी महानगर पालिका प्रशासनाला दिल्या. आयुक्त मोहिते यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.यंत्रणा गतिमान करावी-किशोर जोरगेवारकोरोना विरोधातील लढ्यात नागरिकांकडून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्याही जबाबदाऱ्या वाढल्या आहे. मात्र महानगर पालिका विरोधात काही तक्रारीही आल्या. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेवटच्या गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणा गतिमार करावर, अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. मनपाकडून शहरात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते व अन्य अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या