शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पडोली-घुग्घुस महामार्गावर खड्डयांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

रस्त्याची साफसफाई, वृक्षलागवड, खराब झालेल्या (क्षतीग्रस्त) डांबरीकरण रस्त्याची दुरुस्तीची कामे आयव्हीआरसीएल कंपनीने करायची आहे. मात्र कंपनी वणी-धानोरा व करंजी रस्त्यावर टोलनाके बनवून वाहनांकडून टोल वसुली करीत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती, वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकाचा आरोप आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीची मागणी : टोल नाक्यावर वाहनधारकांकडून वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : पडोली-घुग्घुस-वणी-करंजी महामार्गाचे चौपदरीकरण आयव्हीआरसीएल कंपनीने केले. धानोरा, वणी, करंजी येथे टोल नाके उभारून वाहनधारकांकडून वसुली सुरू आहे. मात्र रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने जागोजागी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी सदर खड्डे बुजवले. मात्र वर्तमान स्थितीत परत जैसे से स्थिती बनली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.खासगीकरणांच्या माध्ययमातून बांधा-वापरा व हस्तांतरित करा, या तत्वावर पडोली, घुग्घुस, वणी, करंजी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम आयव्हीआरसीएल या कंपनीने केले. त्यात घुग्घुसपर्यत तर वणीपर्यत डांबरीकरण करण्यात आले.रस्त्याची साफसफाई, वृक्षलागवड, खराब झालेल्या (क्षतीग्रस्त) डांबरीकरण रस्त्याची दुरुस्तीची कामे आयव्हीआरसीएल कंपनीने करायची आहे. मात्र कंपनी वणी-धानोरा व करंजी रस्त्यावर टोलनाके बनवून वाहनांकडून टोल वसुली करीत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती, वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकाचा आरोप आहे. सहा महिन्यांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांच्याकडे तक्रार करून रस्त्यावरील खड्डयाची दुरुस्ती व वृक्ष लागवड करण्याची विनंती केली. त्यावेळी दुरुस्तीचे काम केले. मात्र दोन महिन्यांत परत रेल्वे लाईन गेटवर घुग्घुस पडोली डांबर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले. यामुळे वारंवार अपघात घडत आहे. त्यामुळे पडोली- घुग्घुस-वर्धा नदी बेलोरापर्यत चौपदरीकरणाच्या डांबरी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ईबादुल सिद्धिकी यांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा