साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST2020-12-24T04:25:43+5:302020-12-24T04:25:43+5:30

मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा वार्ड क्रमांक ५ पावर हाउस मार्ग येथे होईल. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दीपक महाराज ...

Inauguration ceremony of Sai Baba idol | साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा

साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा

मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा वार्ड क्रमांक ५ पावर हाउस मार्ग येथे होईल. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दीपक महाराज व केशवाचार्य महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यानंतर २४ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता महाआरतीला आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थिती राहतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज करणार आहेत. २५ डिसेंबरला हभप नामदेव महाराज यांचे कीर्तन व समाज प्रबोधन कार्यक्रमानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद होईल.

यावेळी प्रमुख पाहुणे भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार,जि.प. सदस्य ॲड हरीश गेडाम, माजी जि.प. सदस्य रामभाऊ टोंगे, पं. स. सभापती इंदिरा पिपरे, माजी पं. स. उपसभापती अंकेश्वर मेश्राम, पं. स. सदस्य गोविंदा पोडे, विद्या गेडाम, अ.भ.गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मारुती गावंडे, डॉ. रमेश यामसनीवार, विद्या देवाळकर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Inauguration ceremony of Sai Baba idol