शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गोदाम सोडले अन् दुकानांवर छापे

By admin | Updated: October 22, 2015 00:46 IST

सणासुदीच्या दिवसांत आभाळाला भिडलेल्या डाळीच्या महागाईवर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने साठेबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

पथक पोहोचले रिकामे : डाळ साठेबाजांवर प्रशासनाची कारवाई संशयास्पदचंद्रपूर : सणासुदीच्या दिवसांत आभाळाला भिडलेल्या डाळीच्या महागाईवर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने साठेबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार ‘मकेका’ अंतर्गत राज्यभरात साठेबाजांवर छापे टाकून कारवाई सुरू आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बुधवारी केलेली कारवाई संशयास्पद असून गोदाम सोडून दुकानांची चौकशी पथकाकडून करण्यात आली. मात्र त्यांना काहीच हाती लागले नाही.राज्य शासनाने निर्देश देताच मंगळवारी राज्यभरात डाळ साठेबाजांवर छापे टाकण्यात आले. सर्व जिल्हा प्रशासनाकडून साठेबाजांवर कारवाई सुरू झाल्याने साठेबाजही सर्तक झाले आहेत. साठा करून ठेवलेला माल सुरक्षीत स्थळी हलविण्याच्या त्यांच्याकडून हालचाली सुरू आहेत. अशातच शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनानेही बुधवारी दुपारी पाच सदस्यीय पथकाद्वारे चंद्रपुरात छापे टाकण्यात आले. या पथकाने गंज वार्र्डातील तीन दुकानांना भेटी देऊन डाळ साठ्याची चौकशी केली. मात्र या तपासणीत त्यांच्या हाती काहीच लागले नाही. साठेबाज हे साठा दुकानात नाही तर गोदामात करून ठेवतात, हेही या पथकाला समजले नसावे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. पाच सदस्यीय पथकात चंद्रपूरचे तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसिलदार जगताप, पुरवठा निरीक्षक अधिकारी सलामे, पुरवठा निरीक्षक धारणे, माने यांचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी) शासनाच्या निर्देशानुसार गंज वॉर्डातील तीन दुकानांची चौकशी करण्यात आली. गोदाम आणि दुकान हे एकाच ठिकाणी होते. दुकानाच्या तपासणीत डाळ परवाना दिल्यापेक्षा साठा कमी आढळून आला. - गणेश शिंदे,तहसिलदार, चंद्रपूर.