शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे. आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आणि बेंगलोर ही शहरेसुद्धा आज पाणीटंचाईने संकटात सापडलेली आहेत.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : लोकसभेचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीसुद्धा देशातील मोठी शहरे आज तहानलेलीच आहे. त्यामुळे शासन रखडलेले सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, असा प्रश्न चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी लोकसभेचे प्रश्नोत्तराच्या तासात मांडला.देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे.आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आणि बेंगलोर ही शहरेसुद्धा आज पाणीटंचाईने संकटात सापडलेली आहेत. कृषिप्रधान भारताची अर्थव्यवस्था मान्सूनच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आज या मोठया शहारांसह ग्रामीण भाग सिंचनाच्या अभावामुळे पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे.शेतकऱ्यांच्या पिकांवर त्याचा विपरित परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढल्या असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.चंद्रपूर जिल्ह्यात लोअर पैनगंगा, गोसेखुर्द यासारखे मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत.मात्र राज्यातील सरकारच्या नियोजनशून्यते मुळे हे प्रकल्प अपूर्ण आहेत. ते केव्हा पूर्ण होणार याची माहिती शासनाने सभागृहाला द्यावी, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. याशिवाय समुद्राचे पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याची काही योजना शासनाची आहे काय, याबद्दलही खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारले. शासनाने नद्यांवर बंधारे बांधण्याची योजना असल्यास जलसिंचनाची समस्या सुटू शकेल आणि दुष्काळावर मात करता येईल, असे ते म्हणाले. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे ख्नासदार बाळू धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.