शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अंधाराचा फायदा घेत अवैध रेती तस्करी

By admin | Updated: October 22, 2016 00:47 IST

चिमूर तालुक्यात सध्या रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. मात्र घरांच्या व इतर बांधकामासाठी रेतीची गरज भासत ...

चिमूर तालुका : वनविभागाच्या नाल्यातून रेतीचा उपसाराजकुमार चुनारकर चिमूरचिमूर तालुक्यात सध्या रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. मात्र घरांच्या व इतर बांधकामासाठी रेतीची गरज भासत असल्याने रेती घाट लिलाव झाले नसतानाही वनविभागाच्या व महसूल विभागाच्या नाल्यातून अवैधरित्या रेतीची तस्करी सुरू असल्याचा प्रकार स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आला आहे. रेती तथा गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी महसूल विभागाकडून परवानगी घेत रॉयल्टी असणे गरजेचे आहे. मात्र चिमूर तालुक्यात रेती घाटाचा लिलाव झालेला नसल्याने तालुक्यातील अवैध रेती वाहतुकदार वनविभाग व महसूल विभागाच्या डोळ्यात धुळ फेकून अवैध रेतीची वाहतूक करीत आहेत. लोकमतने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जंगलाचा फेरफटका मारला असता हा प्रकार उघडकीस आला.पावसाळा संपताच नदी व नाल्यातील पाणी वाहने बंद झाले व नाल्यात मोठ्या प्रमाणात रेती जमा झालेली आहे. त्यामुळे अनेक रेती तस्करांना त्याच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध होत आहे. या अवैध रेतीच्या तस्करीसाठी रेती काढणारे रात्री अंधाराचा फायदा घेत तस्करी करीत आहेत. शेडेगााव, सोनेगाव, मुरपार, वाहनगाव, सोनेगाव, लोहारा, मांगलगाव, जांभुळघाट, नेरी, शिरपूर परिसरातील नाल्यावरुन रेतीचा उपसा होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.या प्रकाराची सत्यता जाणून घेण्यासाठी लोकमतने थेट सोनेगाव, शेडेगाव परिसरातील जंगलातील नाल्यावर भेट दिली असता, अनेक ठिकाणातून रेतीचा उपसा केल्याचे दिसून आले. दिवसा महसूल विभाग व वनविभागाचे अधिकारी यांच्या भितीने रात्री रेती तस्करीचा सपाटा सुरू केल्याचेही काही मजुरांनी सांगितले.नागरिकांच्या मागणीमुळेच रेतीची तस्करीएका रेती वाहतुकदाराशी संपर्क साधला असता, अनेकांच्या घराचे बांधकाम सुरू आहेत. त्यासाठी रेतीची गरज आहे. त्यामुळे आपलाही फायदा व त्यांचेही काम होते. म्हणून नागरिकांच्या गरजापूर्ण करण्याचे काम आम्ही करीत असल्याचे त्यांनी सांगितले.वाहतुकीच्या अंतरानुसार रेतीचे भावसध्या तालुक्यात रेतीच्या एका ट्रॅक्टरला अडीच ते तीन हजार भाव आहे. मात्र २० ते ३० कि.मी पेक्षा दूर न्यायचे असल्यास तीन ते चार हजार रुपये ट्रॅक्टर रेतीचे दर मोजावे लागतात.अंधारातच होते वाहतूकदिवसभर नागरिकांची वर्दळ व महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची पेट्रोलिंग यामुळे या अधिकाऱ्याची नजर चुकविण्यासाठी व इतर ससेमीरा टाळण्यासाठी रात्री अंधारातच रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे.