शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्य माणुसकीने वागला तर ईश्वराची कृपा

By admin | Updated: October 29, 2014 22:47 IST

सर्व सजीवांमधून मनुष्य हा बुद्धिवादी आहे. आपले बरे वाईट तो जाणतो. मात्र स्वार्थी हेतु ठेवून काही जण इतरांप्रती आकस धरून दुसऱ्याचे वाईट आणि आपले चांगले करण्याच्या प्रयत्नात असतात.

स्वामी नरेंद्राचार्य महाराज : गोंडपिंपरीत प्रवचन सोहळागोंडपिपरी : सर्व सजीवांमधून मनुष्य हा बुद्धिवादी आहे. आपले बरे वाईट तो जाणतो. मात्र स्वार्थी हेतु ठेवून काही जण इतरांप्रती आकस धरून दुसऱ्याचे वाईट आणि आपले चांगले करण्याच्या प्रयत्नात असतात. मनुष्य कुठल्याही जाती धर्माचा असो मनुष्य जर मानुसकीने वागला तर त्याचेवर ईश्वराची कृपा होते. ईश्वर हा दयाळू असून सत्संग सान्निध्यातून आपण ईश्वर भक्ती करीत मोक्ष प्राप्तीकडे वळावे, असे प्रतिपादन स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. स्थानिक क्रीडा संकुलाच्या मागील पटांगणात चंद्रपूर जिल्हा सेवा मंडळातर्फे बुधवारी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन पार पडले. यावेळी ते भक्तांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी खा. हंसराज अहीर, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत पराते, पं.स. सभापती रत्नमाला तोरे, उपसभापती रामचंद्र कुरवटकर, बबनराव निकोडे, तेलंगणाचे आमदार के. कोनप्पा, अशोक चिचघरे, बंडू माणूसमारे, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र वेगीनवार उपस्थित होते. स्वामी नरेंद्राचार्य पुढे म्हणाले, प्रत्येक देहाचा अंत हा निश्चित असून प्रत्येकाने मोक्षप्राप्तीसाठी सत्याच्या माध्यमातून मोक्ष मार्ग मिळवावा. स्वप्नातही कुणाचे वाईट चिंतू नये. मग बघा आपल्या जीवनाला यशस्वी वाटचाल मिळणार की नाही, याची प्रचिती नरेंद्राचार्यांनी विविध अभंग गाऊन उपस्थितांना दिली. ईश्वर भक्तीमध्येच जगाचे कल्याण असून अध्यात्म हा ईश्वर भक्तीचा सर्वात सोपा मार्ग असल्याचेही स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी सांगितले. कार्यक्रमास हजारों भाविकांनी हजेरी लावून संत प्रवचन सोहळ्याचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्हा भक्त सेवा मंडळाने परिश्रम घेतले. यावेळी भक्त सेवा मंडळाचे वतीने गरजवंतांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)