६३ पॉझिटिव्ह आढळले तर चार बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST2021-06-17T04:20:06+5:302021-06-17T04:20:06+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ३६४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ६० ...

If 63 tested positive, four victims died | ६३ पॉझिटिव्ह आढळले तर चार बाधितांचा मृत्यू

६३ पॉझिटिव्ह आढळले तर चार बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ३६४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ६० झाली आहे. सध्या ७९३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख २५ हजार १८३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४ लाख ३७ हजार ५९८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५,११२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पूर्णपणे संपला नाही. त्यामुळे मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे, या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह

बाधित आढळलेल्या ६३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १४, चंद्र्पूर तालुका ३, बल्लारपूर ७, भद्रावती ४, ब्रह्मपुरी २, नागभीड ३, सिंदेवाही २, मूल ८, सावली २, पोंभुर्णा १, गोंडपिपरी १, राजुरा ४, कोरपना ८, जिवती १ व इतर ठिकाणच्या ३ रुग्णांचा समावेश आहे. चिमूर व वरोरा येथे एकही रुग्ण आढळला नाही.

Web Title: If 63 tested positive, four victims died