शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे शेकडो घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:01 IST

तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. पुराच्या काळात वरून दिसणारे दृश्ये वरवर होते.

ठळक मुद्देगावकरी मदतीच्या प्रतीक्षेत : सहा गावातील घरांचे सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरला. मात्र, या महापुरामुळे मातीची शेकडो घरे जमीनदोस्त झाले. पूरग्रस्त गावांमध्ये भटकंती केल्यास सर्वत्र घरांचे भग्नावशेष दिसून येतात. शासकीय यंत्रणा नुकसानीचे पंचनामे करण्यात व्यस्त असला तरी मदत केव्हा मिळणार, घरे कशी उभारणार, या प्रश्नाने गावकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. पुराच्या काळात वरून दिसणारे दृश्ये वरवर होते. वैनगंगा नदीपासून बऱ्याच अंतरावर असलेली घरीही पुराच्या पाण्याने कवेत घेतली. लाडज, बेलगाव, किन्ही, पारडगाव, बेटाळा, पिंपळगाव (भो.) रणमोचन परिरात पुराच्या पाण्याने थैमान घातले होते.भोजन मिळाले पण भविष्य अंधारातपूरपीडित नागरिकांना शासन व सामाजिक संस्थांकडून काही प्रमाणात मदत सुरू झाली. नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. मात्र पुरामुळे घरे कोसळल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आहेत. कष्टाने उभारलेले घर पुरात वाहून गेले. जेवण मिळाले पण घरांची उभारणी कशी करायची, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.जनावरांसाठी एक टन चारा उपलब्धमहापुराने सर्व पिके पाण्याखाली आल्याने कुजून गेली. जनावरांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाकडून एक टन चारा उपलब्ध करून देण्यात आला. उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार विजय पवार यांच्या मार्गदर्शनात बोटीच्या साह्याने लाडज येथे चारा पोहचविण्यात आला आहे. पूरग्रस्त गावांची माहिती गोळा करून चारा पुरविण्याचे काम सुरू झाले आहे.केंद्रीय पथक करणार पूरग्रस्त भागाची पाहणीचंद्रपूर : मध्य प्रदेशातील संजय सरोवर व गोसेखुर्द प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकसान झाले. प्केंद्रीय मंत्रालयीन पथक शुक्रवारी व पूरग्रस्त भागाची पाहाणी करणार आहे. दुपारी ४ वाजता ब्रह्मपुरी येथील शासकीय विश्रामगृहात पथकाचे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.१५ वाजता बेलगाव, बेटाळा, सायंकाळी ५.३० वाजता किन्ही, सायंकाळी ५.४५ वाजता गांगलवाडी व बरडकिन्ही येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर हे पथक सायंकाळी ६.१५ वाजता गडचिरोलीकडे रवाना होणार आहे.

टॅग्स :floodपूर