शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

हूमन सिंचन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

भादुर्णी येथील पुलाच्या बांधकामासाठी २२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या परिसरातील नागरिकांना कृषी विषयक संशोधन व प्रशिक्षणासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या हूमन सिंचन प्रकल्पासंदर्भात आपण प्रयत्नशील असून लवकरच या विषयासंदर्भात योग्य तोडगा निघेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : भादुर्णी येथे तालुकास्तरीय क्रीडा संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मूल तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. भादुर्णी या गावातील अंतर्गत विकासकामांसाठी दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला असून उसराळा तसेच उसराळा चक या गावांसाठी दोन कोटी ५० लाख रू. निधी मी मंजूर केला. भादुर्णी येथील पुलाच्या बांधकामासाठी २२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या परिसरातील नागरिकांना कृषी विषयक संशोधन व प्रशिक्षणासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या हूमन सिंचन प्रकल्पासंदर्भात आपण प्रयत्नशील असून लवकरच या विषयासंदर्भात योग्य तोडगा निघेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मूल तालुक्यातील भादुर्णी या गावात आयोजित तालुकास्तरीय क्रीडा संमेलनाच्या उदघाटन समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, माजी सभापती पूजा डोहणे, उपसभापती घनश्याम जुमनाके, सविता सुनिल शेंडे, संवर्ग विकास अधिकारी कलोडे, भादुर्णीच्या सरपंच दीपिका शेंडे, उसराळाचे सरपंच बंडू नरमलवार, भादुर्णीचे उपसरपंच संतोष रेगुंडावार, उसराळाचे उपसरपंच तुषार ढोले, ग्राम पंचायत सदस्य चंद्रकला तोडासे, शुभांगी बोरूले, सविता शेंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. तेव्हा आपल्या क्रांतीकारकांना समाधान वाटेल, असे काम करावे. मानव हा समाजशील प्राणी आहे असे म्हटले जायचे. आज मानव स्वार्थी प्राणी झाला आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करण्याची आवश्यकता आहे. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ऐक्याचे दर्शन घडण्याची आवश्यकता आहे. महिला सशक्तीकरणावर व स्वावलंबनावर भर देत त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार