शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी नहर फुटला

By admin | Updated: October 11, 2015 02:12 IST

घोडाझरी सिंचाई तलावावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर जमिनीवरील धानपिक कालवा फुटला.

शेतकरी संकटात : नवरगाव परिसरातील धान पीक धोक्यातनवरगाव : घोडाझरी सिंचाई तलावावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर जमिनीवरील धानपिक कालवा फुटला. त्यामुळे शेतकऱ्यांचे धानपिक धोक्यात आले आहे. कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नवरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.नवरगाव परिसरातील हजारो हेक्टर शेत जमीन ही घोडाझरी तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परिसरातील धान हे मुख्य पिक आहे. यावर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने घोडाझरी तलावात पाणीसाठासुद्धा कमी होता. कमी पाण्यावर नियोजन करून संबंधित अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी नहर (कालवा) सोडला. शेवटपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक नहर फुटला आणि पाणी वाया गेले. त्यामुळे नहर बंद करून युद्ध पातळीवर जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ बांधकाम दुरुस्ती करण्यात आली व पुन्हा नहर सोडण्यात आला. परंतु पुन्हा नहर फुटल्याने धानपिक धोक्यात आले आहे. मागील पाच-सात दिवसांपासून नवरगावकडे येणाऱ्या नहराचे पाणी बंद आहे.या परिसरात पाण्याचे विशेष साधन नसल्याने घोडाझरीवरच शेतकरी अवलंबून आहेत. मागील २२ दिवसांपासून या परिसरात पाऊस न झाल्याने शेतातील धान पिक संकटात सापडले आहे. पाण्यामुळे धान पिक धोक्यात आले असतानाच करपा, गादमाशी, तुडतुडा अशा रोगांनीही धानावर अतिक्रमण केले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे घोडाझरी सिंचाई विभागाने घोडाझरी नहर लवकर सोडावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)