शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आशा ठरल्या देवदूत

By admin | Updated: September 13, 2014 01:12 IST

ग्रामीण भागात गावागावामध्ये घराघरातून होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अर्भक मृत्यूवर नियंत्रण

राजकुमार चुनारकर खडसंगी ग्रामीण भागात गावागावामध्ये घराघरातून होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अर्भक मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. मागील काही वर्षात चिमूर तालुक्यातील आरोग्य संस्थात प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रसुतीमध्ये अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. यासाठी आशा वर्कर घरोघरी जाऊन गरोदर माताची नोंद व आरोग्य केंद्रातच प्रसुती करण्यासाठी गरोदर माताला प्रवृत्त करीत आहे. त्यामुळे या नवजात बालकासाठी आशा वर्कर देवदूत ठरत आहेत.पूर्वी रुग्णालयात येण्याऐवजी ग्रामीण गरोदर महिलांची घरीच प्रसुती करण्याकडे कल होता. त्यामुळे जन्माला येणाऱ्या कित्येक बालकांना गावामधील अपुऱ्या सोयी सुविधाअभावी उपचार मिळत नव्हते. परिणामी अर्भक, बालमृत्यूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मागील काही वर्षांपासून आशा वर्करच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीची मोहिम शासनाने हाती घेतली आहे. आदिवासी ग्रामीण कुटुंबातील गरोदर महिलांची माहिती घेऊन नोंदी करण्याची जबाबदारी या आशा वर्करवर सोपविण्यात आली आहे. आदिवासी ग्रामीण कुटूंबाचे मतपरिवर्तन करून प्राथमिक आरोग्य केंद्रातच प्रसुती करण्याचे प्रयत्न या स्वयंसेविका करतात. त्यामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात घट होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या आशा वर्कर नवजात बालकासाठी देवदूत ठरत आहेत. या आशा वर्करांना शासनातर्फे मानधन देण्यात येत असल्याने हिरहिरीने काम करीत असल्याचे चित्र गावखेड्यात पहावयास मिळत आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील अशिक्षीत कुटुंबातील प्रसुती प्राथमिक आरोग्य केंद्रातच होण्यास मदत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचे शारीरिक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या किट वापरण्यात येतात. त्यामुळे बालकांना आरोग्य सुविधा मिळतात व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. चिमूर तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्राव्यतिरिक्त ३७ उपकेंद्राची स्थापना केली आहे. या सर्व केंद्रातून प्रसुतीची व्यवस्था केली आहे. पूर्वी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात प्रसुतीची व्यवस्था नसल्याने घरीच प्रसुती करण्यात येत होती.